सोशल मीडियावर प्रा. राम शिंदे व मातोश्रींची बदनामी : माथेफिरूविरोधात जामखेड भाजपचा आक्रमक पवित्रा, भाजपने पोलिसांकडे केली मोठी मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वक्तव्याची मोडतोड करून वर्तमानपत्राने छापलेल्या वृत्ताच्या आधाराने सोशल मीडियावर घृणास्पद, अश्लाघ्य आणि अपमानास्पद पोस्ट लिहिणाऱ्या संदीप पाटील या माथेफिरू व्यक्तीविरोधात जामखेड भाजप आक्रमक झाली आहे.या प्रकरणातील दोषी संदिप पाटील विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने आज (दि. 21 ऑगस्ट) जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

sabhapati Ram Shinde and Matoshree defamation on social media, BJP's aggressive stance against Mathefiru, Jamkhed BJP makes big demand from police, jamkhef latest news,

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात “एक देश में दोन निशाण नहीं चलेंगे” हा भारतीय जनता पक्षाचा काश्मीर विषयीचा ठाम आणि राष्ट्रीय विचार मांडला होता. मात्र या विधानाची मोडतोड करून एका दैनिकाने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर संदीप पाटील या व्यक्तीने सोशल मीडियावर प्रा. राम शिंदे व त्यांच्या मातोश्रींविषयी अश्लाघ्य, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकारामुळे शिंदे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “या वक्तव्यामुळे केवळ आमचे नेते राम शिंदे यांचीच नव्हे तर विधानपरिषदेच्या प्रतिष्ठित खुर्चीचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे संदीप पाटील विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,” असा इशारा शहर भाजप मंडळ अध्यक्ष संजय (काका) काशीद यांनी दिला.

यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर स्वीकारले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, बाजार समिती सभापतीचे सभापती शरद कार्ले, बाजार समितीचे उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक डाॅ. गणेश जगताप, संचालक नारायण जायभाय, संचालक विष्णू भोंडवे, तसेच मनोज कुलकर्णी, उध्दव हुलगुंडे, प्रा. संजय राऊत, विठ्ठल राळेभात, सुभाष जायभाय,प्रविण बोलभट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.