ब्रेकिंग न्यूज : अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर, कर्जत व जामखेडचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही पंचायत समित्या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. कर्जतमध्ये पुरुष तर जामखेडमध्ये महिला सभापती असणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती आरक्षण खालीलप्रमाणे
- संगमनेर – अनुसूचित जाती व्यक्ती
- कोपरगाव – अनुसूचित जमाती महिला
- श्रीरामपूर – सर्वसाधारण व्यक्ती
- शेवगाव – सर्वसाधारण
- राहुरी – सर्वसाधारण
- पारनेर – सर्वसाधारण महिला
- श्रीगोंदा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- कर्जत – नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती
- राहता – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- नेवासा – नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती
- पाथर्डी – अनुसूचित जाती महिला
- नगर – सर्वसाधारण महिला
- जामखेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- अकोले – अनुसूचित जमाती
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या आरक्षण प्रक्रिया सुरु आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेय.आता सदस्यपदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या निवडणूका होणार आहेत. आरक्षण जाहीर होताच इच्छूक उमेदवार अधिक वेगाने रणनिती आखताना दिसणार आहेत.