पुणे खराडी रेव्ह पार्टी प्रकरण : कोण आहे प्रांजल खेवलकर?Pune Kharadi Rave Party Case मध्ये खडसे कनेक्शन काय? जाणून घ्या सविस्तर
Who is Pranjal Khewalkar : रविवारी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा (rave party Pune) पर्दाफाश केला. ही पार्टी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी (kharadi) भागातील Stay Bird या फ्लॅटवर सुरू होती. या प्रकरणात जेष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse son in low) यांचे जावई तथा रोहिणी खडसे (rohini khadse husband) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचा सहभाग असल्याचे समोर आले. या घटनेनंतर रविवारी दिवसभर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत ? त्यांचा व्यवसाय काय? जाणून घेऊयात!

प्रांजल खेवलकर हे मुळचे जळगाव येथील आहेत. त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून डाॅक्टर ऑफ मेडिसिनचे (MD) शिक्षण घेतलेले आहे. प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. दोघांनी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर १४ फेब्रुवारी २०१३ रोजी विवाह केला. या दाम्पत्याला दोन जुळे मुलं आहेत. प्रांजल हे व्यवसायात तर रोहिणी खडसे ह्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत. रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादीत महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात.
रोहिणी खडसे यांनी २०२४ ची विधानसभा निवडणुक मुक्ताईनगर मतदारसंघातून लढवली होती.यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पतीच्या संपत्तीचा उल्लेख आहे. २०२३ – २४ या आर्थिक वर्षांत प्रांजल खेवलकर यांचे आर्थिक उत्पन्न ३६ लाख ६३ हजार रुपये होते. तर २०२०-२१ या वर्षात त्यांचे उत्पन्न तब्बल ५२ लाख ०४ रुपये इतके होते. खेवलकर यांच्याकडे बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि जीप मेरिडीयन अश्या तीन चारचाकी आहेत. याशिवाई मुक्तानगरमधील मौजे कोथळीत शेतजमीन, पुण्यातील बाणेरमध्ये वाणिज्य संकुलातील नवव्या मजल्यावर कार्यालय, वानवडीत एक दुकान आणि कार्यालये आहे. तसेच हडपसर येथे बंगला असून नाशिक- मुक्ताईनगर येथे देखील निवासी जागा आहेत. प्रांजलवर कोट्यवधींचे कर्ज देखील आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर उद्योजक, डॉक्टर आणि निर्माता असा उल्लेख आहे. समर प्रॉडक्शन या कंपनीद्वारे प्रांजल काही म्यूझिक व्हिडिओची निर्मितीदेखील त्यांनी केली आहे. प्रांजल हे समाजकार्याशी देखील जोडलेले असून त्यांची एक समाजसेवी संस्था देखील आहे. याशिवाय इव्हा योगा, एपी इव्हेंट्स अँड मीडिया या कंपन्यांचे ते संस्थापक आहेत. रिअल इस्टेट, ऊर्जा अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहे.