जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार, कौशल्य विकास आणि सरकारी आर्थिक साहाय्य एकाच छताखाली मिळवून देणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना” (PMIS) आता अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठीही खुली झाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २१७ पदे भरली जाणार आहात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री रोजगार व कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत सुरू केलेल्या या सरकारी योजनेद्वारे पुढील पाच वर्षांत संपूर्ण देशातील एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी
अहिल्यानगरमध्ये तब्बल २१७ पदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींसाठी या योजनेअंतर्गत सुमारे २१७ इंटर्नशिप पदे उपलब्ध असून ही संधी मर्यादित काळासाठीच आहे. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
दरमहा ₹५,००० स्टायपेंड; एकरकमी ₹६,००० बोनस
- या सरकारी स्टायपेंड योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक इंटर्नला —
- कामावर रुजू होताना एकरकमी ₹६,००० अनुदान
- पुढील ९ महिन्यांसाठी दरमहा ₹५,००० स्टायपेंड (केंद्र सरकारचे ₹४,५०० + कंपनीचे ₹५००)
- प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण आणि कार्यानुभव
यामुळे युवकांना आर्थिक मदतीसह खाजगी क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
२,००० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा
देशभरातील सुमारे २,००० नामांकित कंपन्यांशी सरकारचा करार झाला असून उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रता, रुची आणि कौशल्यानुसार कंपनी निवडू शकतात. ही फ्री गव्हर्नमेंट ट्रेनिंग स्कीम विशेषतः खाजगी क्षेत्रातील रोजगारासाठी तयार होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कोण अर्ज करू शकतो?
- वय : २१ ते २४ वर्षे
- पात्रता : शिक्षण पूर्ण केलेले किंवा सध्या रोजगारात नसलेले बेरोजगार युवक-युवती
असा करा ऑनलाइन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ https://pminternship.mca.gov.in वर नोंदणी करून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावा.अधिक माहितीसाठी ०२४१-२९९५७३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.