जामखेड : आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात हाळगाव कृषि महाविद्यालयाच्या खेळाडूने केले राहुरी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ०४ ते ०८ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या अश्वमेध २७ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कबड्डी संघात हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाची खेळाडू ज्ञानेश्वरी महेंद्र गायके या विद्यार्थिनीनीने प्रतिनिधित्व केले.

तसेच, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. प्रशांत सावंत यांनी राहुरी विद्यापीठाच्या मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली नांदेड येथे पार पडलेल्या क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रातील एकूण २४ विद्यापीठांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून निरनिराळ्या क्रीडा प्रकारांत आपले गुणप्रदर्शन दाखवले.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी या निवडीबद्दल खेळाडू व मार्गदर्शक डॉ. प्रशांत सावंत यांचे कौतुक केले. आपल्या महाविद्यालयातील खेळाडू व संघ मार्गदर्शक यांची क्रीडा महोत्सवात झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. प्रशांत सावंत व समुपदेशक प्रा. अर्चना महाजन यांनी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले.
