जामखेड : भाजपच्या निष्ठावंत कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यकर्त्याच्या पाठीशी एकवटली जनता, प्रभाग अकरामध्ये पै. सागर (भाऊ) टकले यांच्या नावाचा जोरदार बोलबाला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा | सत्तार शेख। जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. शहरात इच्छूक उमेदवारांनी जोरदार जनसंपर्क मोहिम हाती घेतली आहे.यामध्ये भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार सामाजिक कार्यकर्ते पै. सागर (भाऊ) टकले यांनी प्रभाग अकरामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रभागात पै.सागर (भाऊ) टकले यांचा जोरदार बोलबाला असून येथील जनता त्यांच्या पाठीशी एकवटल्याचे चित्र आहे. टकले यांच्या रूपाने भाजपला एक तगडा, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवार मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे प्रभाग 11 चे वातावरण भाजपमय बनू लागल्याचे दिसत आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत आपले नशिब आजमावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते पै. सागर भाऊ टकले यांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली. युवकांचे तगडे संघटन पाठीशी असलेल्या सागर भाऊ टकले यांनी प्रभागात जोरदार जनसंपर्क मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्या मोहिमेला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग अकरामध्ये समाविष्ट असलेल्या भागात घरोघरी जाऊन त्यांनी जनतेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.थेट जनतेत मिसळून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
“भावी नाही, आमचे फिक्स नगरसेवक!”- जनतेचा आवाज
पै.सागर भाऊ टकले हे बटेवाडी येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी शहरात युवकांचे मोठे संघटन उभारले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी प्रभागातील प्रत्येकाशी थेट नाळ जोडली आहे. कायम जनतेत राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवणारा, जनतेच्या हाकेला सदैव धावून जाणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांच्या पाठीशी तरूणाईसह प्रभागातील जेष्ठ नागरिक व महिलांची ताकद मोठ्या प्रमाणात एकवटलेली आहे. सागर भाऊ टकले हे ‘भावी नाही तर आमचे फिक्स नगरसेवक’ आहेत असेच प्रभागातील जनतेतून बोलले जात आहे. टकले यांना जनतेतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांची उमेदवारी जनतेनेच हातात घेतल्याचेच संकेत देणारी ठरू लागली आहे.
कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या पै. सागर (भाऊ) टकले यांनी समाजकारणात कार्यरत राहत आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली होती. कोरोना महामारीच्या काळात कोणी कोणाच्या जवळ जात नसताना, सर्वत्र भीतीचे वातावरण असताना पै. सागर (भाऊ) टकले यांनी मयत कोरोना रूग्णांचे अंत्यविधी करण्यासाठी स्वखर्चाने स्वता:ची टीम कार्यरत केली होती. ही टीम नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या साथीने काम करत होती. कोणतीही प्रसिद्धी न करता इमानदारीने काम करणाऱ्या या टीमने मानवतेचा खरा आदर्श दाखवून दिला होता.
युवकांचे संघटन आणि सामाजिक उपक्रम
पै. सागर भाऊ टकले यांनी स्वखर्चातून कोकोरेवस्ती, खरातवस्ती, टकले वस्ती, शिंदेमळा या भागातील रस्त्यांसाठी मुरुमीकरणाचे काम पार पाडले. गणेशोत्सव काळात त्यांना महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करत महिला भगिनींसाठी अनेक बक्षींसाचे वितरण केले. त्याचबरोबर नवरात्रोत्सव काळात शेकडो महिलांना त्यांनी तुळजापूर येडाई देवीचे दर्शन घडवून आणले. दिवाळीत त्यांनी गरजूंना किराणा व प्रभागातील जनतेला दिवाळी फराळाचे वाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रभागात स्वच्छता अभियान राबवत स्वच्छ सुंदर प्रभागाचा नारा दिला. नगरसेवक नसतानाही टकले यांनी प्रभागात केलेले काम उल्लेखनीय आहे, अशी जनतेत चर्चा आहे.
राजकारण न करता समाजकारणात रमणारा, आश्वासन न देता थेट प्रश्नांची सोडवणूक करणारा कार्यकर्ता आपल्या प्रभागाच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलू शकतो, असा ठाम विश्वास प्रभागातील जनतेचा झाल्याने यंदाच्या निवडणुकीत पै. सागर भाऊ टकले यांनाच आपल्या हक्काचा नगरसेवक बनवायचा पक्का इरादा जनतेने केला आहे. प्रभाग अकरा मध्ये टकले यांच्याच नावाची जोरदार चर्चा असल्यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.