Ram Shinde : राम शिंदेंना सभापतीपदावरून हटवण्याचा विरोधकांचा डाव फेल, अखेर विरोधी पक्षनेत्याकडून ‘तो’ प्रस्ताव मागे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म. वि. प. नियम 11 नुसार सभापती यांना पदावरुन दूर करण्याबाबत विधानपरिषदेत प्रस्ताव सादर केला होता.मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षाने हा प्रस्ताव मागे घेतला. याबाबतचे पत्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सादर केले.प्रा राम शिंदे यांना सभापती पदावरुन हटवण्याचा विरोधी पक्षाचा डाव सपशेल अपयशी ठरला.

Opposition's plan to remove Prof Ram Shinde from the post of Speaker fails, the proposal is withdrawn by the opposition leader

“महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहात दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांकडून व्यक्त झालेल्या तीव्र भावना, उद्भवलेल्या काही प्रसंगांमुळे विरोधी पक्ष नेत्यांचा आणि सदस्यांचा हक्क अबाधित राखला जात नसल्याने सार्वभौम सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी यासाठी 19 मार्च 2025 च्या सूचनेद्वारे विरोधी पक्षातील आमदार व विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांना पदावरुन दूर करण्याबाबत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म. वि. प. नियम 11 नुसार विधानपरिषदेत प्रस्ताव सादर केला होता.

मात्र, 21 मार्च, 2025 रोजी विरोधी पक्षांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेच्या अनुषंगाने, उपरोक्त सर्व मुद्यांवर मुख्यमंत्री महोदयांनी समाधानकारकरित्या आश्वस्त केले असल्याने, सभागृहात खेळीमेळीचे वातावरण रहावे आणि लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा सन्मान राखला जावा म्हणून आम्ही सभापतींना पदावरुन दूर करण्यासंबंधी दिलेली संदर्भाधीन प्रस्तावाची सूचना मागे घेत आहोत, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 26 मार्च, 2025 रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आहे.

या पत्रावर दानवे यांच्यासह एकनाथराव खडसे, ॲड.अनिल परब, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, सचिन अहिर, सुनिल शिंदे, राजेश राठोड, प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर यांच्या सह आदी आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत