Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या वतीने रील्स स्पर्धेचे आयोजन, लाखोंची बक्षीसे जिंकण्याची संधी, स्पर्धेत असा घ्या सहभाग

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्स २०२५ (Ganeshotsav 2025) निमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २७ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम तारीख ७ सप्टेंबर असणार आहे.विजेत्यांना सरकारच्या वतीने भरघोस बक्षीसे दिले जाणार आहेत. ही स्पर्धा तीन गटांत असणार आहे. यात देश विदेशातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. जाणून घेऊयात नियम व अटी.

occasion of Ganeshotsav 2025 maharashtra government organiz reels competition, there is chance to win prizes worth lakhs, online form submt participate in competition

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये आहे.

महसूल विभाग स्तर

  • प्रथम पारितोषिक – रूपये २५ हजार
  • द्वितीय पारितोषिक – रूपये १५ हजार
  • तृतीय पारितोषिक – रूपये १० हजार
  • उत्तेजनार्थ पारितोषिक – रूपये ५ हजार

राज्यस्तर

  • प्रथम पारितोषिक – रूपये १ लाख
  • द्वितीय पारितोषिक – रूपये ७५ हजार
  • तृतीय पारितोषिक – रूपये ५० हजार
  • उत्तेजनार्थ पारितोषिक- रूपये २५ हजार

महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील (खुला गट)

  • प्रथम पारितोषिक – रूपये १ लाख
  • द्वितीय पारितोषिक – रूपये ७५ हजार
  • तृतीय पारितोषिक – रूपये ५० हजार
  • उत्तेजनार्थ पारितोषिक- रूपये २५ हजार

स्पर्धेच्या नियम व अटी

  1. स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन अर्जाद्वारे करावी.
  2. स्पर्धकांनी घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणांच्या गणेशोत्सवाच्या रील तयार करणे आवश्यक राहील.
  3. स्पर्धेचा कालावधी दिनांक २६ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर २०२५ असा आहे.
  4. स्पर्धकांनी गणेशोत्सवामध्ये, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर यांच्यापैकी कोणतीही एक थीम मध्यवर्ती ठेवून किमान ३० सेकंद ते कमाल ६० सेकंदापर्यंत रील तयार करावी.
  5. रील शूट करताना, कोणत्याही सार्वजनिक मंडळाचे, सार्वजनिक ठिकाणाचे चित्रीकरण करणार असाल तर संबंधित मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मंडळांनी आपल्या रील वर आक्षेप घेतल्यास सदर स्पर्धकाला बाद करण्यात येईल.
  6. रील RATIO १६:९ म्हणजेच उभा (व्हर्टिकल) असावा.

स्पर्धकांनी स्वतःच्या INSTAGRAM व FACEBOOK हॅन्डल्सवर रील्स पोस्ट करणे बंधनकारक राहील. रिल पोस्ट करताना फिल्मसिटी मुंबईच्या ऑफिशियल INSTAGRAM आणि FACEBOOK हॅण्डलला COLLAB करणे बंधनकारक आहे.

  • स्पर्धकांनी कोणत्या विषयाला अनुसरून रील तयार केली आहे याचं थोडक्यात वर्णन करावं.
  • अर्जामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम माध्यमातून अपलोड केलेल्या रीलची लिंक योग्य पद्धतीने भरावी.
  • रील तयार करताना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रिल्सवर कृत्रिम पध्दतीने लाईक, व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास स्पर्धकास बाद ठरविण्यात येईल.
  • महाराष्ट्रातील स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी आपापल्या महसूल विभागातून करावी.

विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, आपण ज्या ठिकाणी चित्रीकरण करणार आहात, किंवा ज्या ठिकाणावरील गणपती बाप्पा रीलमध्ये दिसेल त्या विभागातून आपली नोंदणी करावी लागेल. (म्हणजे आपण पुण्यात राहत असाल, आणि रील रत्नागिरीतील गणपती बाप्पाची असेल तर आपला विभाग रत्नागिरी म्हणजेच कोकण महसूल विभाग ग्राह्य धरला जाईल.)

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, विभागीय पातळीवरील स्पर्धकांमधूनच राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा केली जाईल.

  • तिन्ही गटांसाठी एकच नोंदणी अर्ज असून त्यात एका स्पर्धकाने एकदाच नोंदणी करावी.
  • नोंदणी अर्जामध्ये आपल्या राज्याचा / देशाचा योग्य उल्लेख करावा.
  • गणपती बाप्पाचे स्थळ समजावे याकरिता चित्रीकरणादरम्यान गुगल टॅग फोटो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे
  • अर्ज भरण्यापूर्वी, स्पर्धेचे नियम व अटी आणि शपथपत्र काळजीपूर्वक वाचावे.
  • परिक्षकांनी दिलेला निकाल अंतिम असेल.
  • स्पर्धेत कोणत्याही टप्यावर बदल अथवा स्पर्धा रद्द करण्याचा सर्वाधिकार महामंडळ राखून ठेवत आहे.

स्पर्धकांनी खालील गोष्टी करू नये.

  • सार्वजनिक मंडळाची परवानगी न घेता चित्रीकरण करू नये.
  • रील मध्ये अश्लील, धार्मिक भावना दुखावणारे, वादग्रस्त मजकूर/दृश्य ठेवू नये.
  • ६० सेकंदांपेक्षा जास्त किंवा ३० सेकंदांपेक्षा कमी कालावधीची रील तयार करू नये.
  • HORIZONTAL (आडवे) व्हिडिओ शूट करू नये; फक्त VERTICAL (उभा) स्वरूप मान्य आहे.
  • रील अपलोड करताना FILMCITY MUMBAI हँडलला COLLAB न केल्यास सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.
  • इतरांचा कॉपीराइट असलेला व्हिडिओ, फोटो विनापरवानगी वापरू नये.
  • रील पोस्ट केल्यानंतर विहित नमुन्यात आणि कालमर्यादेत स्पर्धा अर्ज भरला गेला नाही तर स्पर्धेतील सहभाग अमान्य ठरेल.
  • स्पर्धकांने खोटी माहिती, चुकीची लोकेशन किंवा बनावट परवानगी दाखवू नये.