Girish Mahajan news : महाराष्ट्रात पुन्हा मोठे राजकीय भूकंप होणार – मंत्री गिरीश महाजन यांचे भाकीत, राज्याच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Girish Mahajan news : 2019 पासून महाराष्ट्राचे राजकीय पटल सातत्याने अस्थिर आहे. महाराष्ट्राचे राजकारण आणि राजकीय भूकंप हे समीकरण आता नित्याचे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या पक्षातील नेता दुसर्या पक्षात प्रवेश करत आहे. त्यातच आता महाराष्ट्राला अपेक्षित नसतील असे राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा भाजपचे संकटमोचक तथा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव दौर्यावर असताना केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात येत असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जळगाव दौर्यावर असताना मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “उल्हास पाटील (dr ulhas patil) यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही. हा भूकंप कसा होतो ते माहीत नाही. मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा महाराष्ट्रात होणार आहेत”, असे सूचक संकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. (Girish Mahajan news)
गिरीश महाजन यांनी याआधीही राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसावा तशा राजकीय घटनाही घडल्या आहेत. सर्वात पहिली घटना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली, दुसरी घटना म्हणजे सत्तांतरानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 40 आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला.(Girish Mahajan news)
राज्यातील दोन विरोधी पक्षांत मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडेल, अशा चर्चा सातत्याने होत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या दरम्यानच्या काळात काही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा समोर आली. पण त्या नेत्यांनी संबंधित दावे तात्काळ फेटाळले आहेत. तरीदेखील उल्हास पाटील सारख्या दिग्गज नेत्यांनं भाजपात जाणं हे काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार पडण्यासारखंच आहे. त्यामुळे आगामी काळात गिरीश महाजन यांचं भाकीत खरं ठरतं की काँग्रेस एकसंघ राहण्यात यशस्वी होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.(Girish Mahajan news)
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठमोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वर्तवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला तेव्हा गिरीश महाजन यांनी आगामी काळात राजकारणात मोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं.त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसेच संकेत वर्तवले आहेत. (Girish Mahajan news)