अभिमानास्पद! मानवी इतिहासातील सुवर्णक्षण; नासाच्या ‘आर्टेमिस-२’ ने मोडला ५५ वर्षांचा विक्रम, नवा इतिहास रचत पार केले ४ लाख किमी अंतर!

वॉशिंग्टन : अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात आजचा दिवस ठरला. अमेरिकेच्या नासा (NASA) या अंतराळ संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ (Artemis II) मोहिमेतील अंतराळवीरांनी ऐतिहासीक कामगिरी केली. पृथ्वीपासून तब्बल ४ लाख किलोमीटर (२,४८,६५५ मैल) अंतर पार करत आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला. मानवी इतिहासातील हा आजवरचा सर्वाधिक लांबचा अंतराळ प्रवास ठरला असून, या मोहिमेने ५५ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

Nasa artemis 2 breaks 55 year old space record, artemis 2 moon mission creates history 4 lakh km,

अपोलो १३ चा विक्रम इतिहासजमा

यापूर्वी पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाण्याचा विक्रम १९७० मधील ‘अपोलो १३’ (Apollo 13) मोहिमेच्या नावावर होता. त्या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी गाठलेले कमाल अंतर गेल्या साडेपाच दशकांपासून अबाधित होते. मात्र, आज भारतीय वेळेनुसार रात्री ११:२६ वाजता (१:५६ PM EDT) आर्टेमिस-२ च्या अंतराळवीरांनी हे अंतर ओलांडून नवा जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केला.

थक्क करणारा प्रवास

आर्टेमिस-२ ही नासाची चंद्राभोवती मानवी प्रदक्षिणा घालणारी महत्त्वाची मोहीम आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीपासून ४ लाख किलोमीटरची सीमा ओलांडणे ही संपूर्ण मानवजातीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. ‘अपोलो १३’ मोहिमेत तांत्रिक बिघाड होऊनही अंतराळवीर सुखरूप परतले होते, त्या ऐतिहासिक मोहिमेची आठवण आज या निमित्ताने पुन्हा ताजी झाली आहे.

  • मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:
  • नवे अंतर: २,४८,६५५ मैल (सुमारे ४ लाख किमी).
  • जुना रेकॉर्ड: १९७० च्या ‘अपोलो १३’ मोहिमेचा ५५ वर्षांचा विक्रम मोडला.
  • वेळ: भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११:२६ वाजता विक्रम नोंदवला गेला.
  • मोहीम: नासाची आर्टेमिस-२ (Artemis II)

आजवर कोणताही मानवी जीव पृथ्वीपासून इतक्या अथांग अंतरावर गेला नव्हता. आर्टेमिस-२ च्या या यशाने आता चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवण्याच्या आणि भविष्यातील मंगळ मोहिमांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. हा केवळ अमेरिकेचा विजय नसून विज्ञानाच्या प्रगतीतील संपूर्ण जगाचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.