लोकसभा निवडणूकीबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, आज अंतरवली सराटीच्या महासंवाद बैठकीत काय ठरलं ? जाणून घ्या सविस्तर

Manoj Jarange Lok Sabha Election : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या मराठा समाजाने अगामी लोकसभा निवडणुकीसाठी आक्रमक रणनिती आखली आहे. गेल्या काही दिवसांपासून  गावागावात रणनीती तयार केली जात आहे. मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत घेतली जात आहे.परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत वेगळी भूमिका जाहीर केली आहे.

Manoj Jarange Patil big announcement about Lok Sabha elections, what was decided in general dialogue meeting of Antarvali Sarati today? Know in detail,

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर आज 24 मार्च रोजी मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक बोलावली होती. “बैठकीला उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने आपआपल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्यावी आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत समाजातील लोकांचा काय विचार आहे ते जाणून घ्यावं. लोकांचं काय मत आहे, ते मला पुढील चार दिवसांत लेखी आणून कळवा, त्यानंतर आपण अंतिम निर्णय घेऊ,” अशी भूमिका मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत मांडली आहे.

यावेळी जरांगे पाटील यांनी आपलं वैयक्तिक मतंही नोंदवलं आहे. “माझं तर म्हणणं आहे की, आपण लोकसभेच्या नादी न लागता विधानसभा निवडणुकीत यांना आपला हिसका दाखवून देऊ,” असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली असली तरी सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगेंकडून केली जात आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनई आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाटील म्हणाले की, “निवडणूक लढवण्याबाबत भावनिक निर्णय घेऊन चालणार नाही. समाजाचा पराभव होता कामा नये. यासाठी सर्वांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. तुम्ही गावात बैठका घेऊन लोकांचं काय म्हणणं येत आहे, ते लिहून काढा आणि ३० तारखेच्या आत माझ्यापर्यंत पोहोचवा. ३० तारखेला आपण अंतिम निर्णय घेऊ,” असं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. तसंच वैयक्तिरित्या आपण लोकसभेची निवडणूक न लढवता समाजाने विधानसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, या मताचा मी असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, या माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

रविवारी अंतरवली सराटीत झालेल्या समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मला राजकारणात ओढू नका. आपला प्रश्न लोकसभेचा नाही तर विधानसभेचा आहे. लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात फॉर्म भरणे किचकट प्रक्रिया आहे. यामुळे एकच उमेदवार द्या. तसेच तुम्हाला गावात बैठक घ्यायची असेल तर त्याची नोंद ठेवा आणि हे 30 मार्चच्या आता निर्णय घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता तुम्ही ठरवले आहे, प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हे मी नाही ठरवले नाही. मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो. मराठा समाजाला मी सात महिन्यांत पराभूत होऊ दिले नाही. लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे. मराठा आणि कुणबी असल्याचा आधार मिळाला आहे, आता सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही मागणी आहे. आचारसंहिता संपल्यावर जर सरकारने आदेश काढला नाही तर त्यावेळी बघू.

मराठा समाजाचे 17 ते 18 मतदारसंघावर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लीम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा तू सग्या सोयऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..?

मराठ्यांनी कोणत्याही प्रचार सभेला जायचे नाही. त्यासाठी तुम्हाला येथून गावात जावे लागणार आणि गावात जाऊन बैठक घ्यावी लागणार आहे. मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची आहे. उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे ठरवायचे आहे. मराठ्यांनी अपक्ष लढवायचा निर्णय घेतला तर चार जाती एकत्र आले पाहिजे. राज्यकर्त्यांना यांना हिसका दाखवायचा असेल तर लोकसभा नाही तर विधानसभा महत्त्वाची आहे. आपली मते विखुरली जाऊ नये.