जामखेड येथील बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना, बैलगाड्याच्या धडकेत अंकुश महाराज वाळके यांचे निधन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड येथे आज (२३ डिसेंबर रोजी) पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. बैलगाडी शर्यत पाहत असताना खांडवी येथील ह.भ.प.अंकुश महाराज वाळके (वय ४५) यांना बैलगाड्याची जोरदार धडक बसली.या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे खांडवीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Major accident in bullock cart race in Jamkhed, Ankush Maharaj Walke dies in bullock cart collision, jamkhed news today,

जामखेड येथील एमआयडीसी मैदानावर काळोबा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी खांडवी येथील अंकुश महाराज वाळके हे बैल घेऊन आले होते. शर्यत पाहत असतानाच बैलगाड्याची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सायंकाळी त्यांच्यावर खांडवी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.