MahaVistaar AI App : सरकारने शेतकऱ्यांसाठी लाँच केले पहिले डिजिटल सल्लागार एआय ॲप, महाविस्तार एआय ॲपची वैशिष्ट्ये काय? शेतकऱ्यांना फायदा काय? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : MahaVistaar AI App : भारतातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक डिजिटल साधन उपलब्ध करून देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित ‘महाविस्तार-AI’ ॲप आता शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाजापासून पीक व्यवस्थापन, बाजारभाव, खत गणक, कीडनियंत्रण, रोगनियंत्रण अशा सर्व गोष्टींबाबत त्वरित व तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे.

MahaVistaar AI App,First digital advisor for farmers MahaVistaar AI App launched, know features of app,

ॲपची मुख्य वैशिष्ट्ये (MahaVistaar AI App features)

  • रिअल-टाइम हवामान सल्ला – पर्जन्यमान, आर्द्रता व वाऱ्याचा वेग याबाबत अचूक माहिती.
  • पीक व्यवस्थापन व तंत्रज्ञान मार्गदर्शन – पेरणीपासून काढणीपर्यंत स्मार्ट मार्गदर्शन.
  • मृदा आरोग्य पत्रिका व खत मात्रा गणक – जमिनीच्या आरोग्यानुसार खतांचा योग्य वापर.
  • कीड व रोग नियंत्रण उपाय – तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरित उपाय योजना.
  • बाजारभाव माहिती – प्रमुख बाजारपेठांतील दर रोजच्या अपडेटसह.
  • AI Chat Box – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तर देणारे डिजिटल सल्लागार.

महाविस्तार एआय ॲपचे उद्दिष्ट

‘महाविस्तार-AI’ चा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्वरित, स्थानिक व अचूक मार्गदर्शन मिळावे, उत्पादनात वाढ व्हावी आणि शेती खर्चात बचत व्हावी. यामुळे शेतकऱ्यांचा निर्णयक्षमता वाढेल आणि शेतीत नफा मिळवणे सोपे होईल.

प्रचार व प्रसिद्धी मोहीम

या ॲपचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य शासनाने विशेष प्रचार मोहीम हाती घेतली आहे.

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड करण्यास व वापर मार्गदर्शन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सप्टेंबर 2025 पासून सर्वाधिक डाउनलोड्स व सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत आपले अनुभव ऑडिओ/व्हिडिओ स्वरूपात पाठवावे, निवड झालेल्यांना गौरवण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी नवे पर्व

शेतीला अधिक स्मार्ट, तंत्रज्ञानाधिष्ठित व शाश्वत बनवण्यासाठी हे ॲप एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हवामानातील अनिश्चितता, कीडरोगांचा प्रादुर्भाव, खतांच्या चुकीच्या वापरामुळे होणारे नुकसान या सर्व प्रश्नांची उत्तरे महाविस्तार-AI च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोप्या भाषेत व सहज उपलब्ध होणार आहेत.

📲 आजच Google Play Store वरून ‘MahaVistaar-AI’ ॲप डाउनलोड करा आणि आपल्या शेतीला द्या स्मार्ट मार्गदर्शन!