Local Body Elections 2025 : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, कोणत्या गणामध्ये कोणत्या गावांचा समावेश ? जाणून घ्या संपुर्ण यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Local Body Elections 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. (Jilha Parishad Nivadnuk 2025) या निवडणुकांसाठी प्रशासनाने आज १४ रोजी जि. प. गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. जामखेड तालुक्यात एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती गण वाढले आहेत.प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेतून काही इच्छूकांचा हिरमोड झाला असून काहींसाठी नवी संधी (लाॅटरी) चालून आली आहे. (Panchayat Samiti Election 2025)

Local Body Elections 2025, Draft ward structure of Zilla Parishad groups and Panchayat Samiti ganas announced, which villages are included in which ganas? Know the complete list,

प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी २१ जुलै पर्यंत अंतिम मुदत आहे. या हरकती योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे अवाहन प्रशासनाने केले आहे.

पुर्वी जामखेड तालुक्यात 3 जिल्हा परिषद गट होते, परंतू जामखेड नगरपरिषद स्थापनेमुळे  तालुक्यात दोन गट राहिले होते. आता मात्र नव्या प्रारूप प्रभाग रचनेत जामखेड तालुक्यात तिसरा जिल्हा परिषद गट निर्माण झाला आहे. यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (jilha parishad nivadnuk 2025, Panchayat Samiti Election 2025)

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद गट किती ?

1) साकत
2) खर्डा
3) जवळा

जामखेड तालुक्यात पंचायत समिती गण किती ?

1) शिऊर
2) साकत
3) खर्डा
4) नान्नज
5) अरणगाव
6) जवळा

शिऊर पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) मोहा
2) सावरगाव
3) राजुरी
4) डोळेवाडी
5) शिऊर
6) घोडेगाव
7) झिक्री
8) धोंडपारगाव
9) सारोळा
10) काळेवाडी
11) पाडळी
12) खुरदैठण

साकत पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) साकत
2) कोल्हेवाडी
3) पिंपळवाडी
4) देवदैठण
5) नाहूली
6) नायगाव
7) जायभायवाडी
8) बांधखडक
9) तेलंगशी
10) आनंदवाडी
11) पिंपळगाव आळवा
12) धामणगाव

खर्डा पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) खर्डा
2) नागोबाचीवाडी
3) मुंगेवाडी
4) पांढरेवाडी
5) दरडवाडी
6) दिघोळ
7) माळेवाडी
8) मोहरी
9) जातेगाव
10) लोणी
11) बाळगव्हाण

नान्नज पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) नान्नज
2) आपटी
3) वाकी
4) सातेफळ
5) पिंपळगाव उंडा
6) तरडगाव
7) वंजारवाडी
8) दौंडाचीवाडी
9) सोनेगाव
10) धनेगाव
11) जवळके
12) राजेवाडी
13) महारूळी
14) गुरेवाडी
15) पोतेवाडी
16) वाघा

अरणगाव पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) डोणगाव
2) अरणगाव
3) पारेवाडी
4) फक्राबाद
5) पाटोदा
6) खामगाव
7) भवरवाडी
8) धानोरा
9) वंजारवाडी
10) रत्नापुर
11) सांगवी
12) कुसडगाव
13) सरदवाडी
14) खांडवी
15) डिसलेवाडी

जवळा पंचायत समिती गणातील गावांची नावे

1) मुंजेवाडी
2) चोभेवाडी
3) बोर्ले
4) चोंडी
5) आघी
6) जवळा
7) कवडगाव
8) गिरवली
9) पिंपरखेड
10) हसनाबाद
11) बावी
12) हळगाव