Ladaki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो घरबसल्या अशी करा E-KYC प्रक्रिया, जाणून घ्या अगदी सोप्या शब्दांत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा :Ladaki Bahin Yojana E-KYC : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाने यासाठी सोपी व सुलभ अशी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अनेक लाभार्थिनींना अजूनही ही प्रक्रिया नेमकी कशी करायची याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने अधिकृत संकेतस्थळावरून घयबसल्या ही प्रक्रिया कशी करायची याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Ladaki Bahin Yojana E-KYC : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अशी करा e-KYC प्रक्रिया
- संकेतस्थळावर भेट द्या
- लाभार्थ्यांनी सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.
- संकेतस्थळ उघडल्यावर मुखपृष्ठावरच e-KYC बॅनर दिसेल.
- या बॅनरवर क्लिक केल्यास e-KYC फॉर्म उघडतो.
आधार पडताळणी कशी कराल?
- e-KYC फॉर्ममध्ये लाभार्थ्याने – स्वतःचा आधार क्रमांक,
- पडताळणी संकेतांक (Captcha Code) भरावा.
- यानंतर आधार पडताळणीस संमती देऊन Send OTP या बटणावर क्लिक करावे.
- आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल.
- हा OTP टाकून Submit करावा.
आधीच KYC झाल्यास काय?
- प्रणाली तपासेल की तुमची KYC आधीच पूर्ण झाली आहे का.
- जर आधीच पूर्ण असेल तर संदेश दिसेल – “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे”.
जर KYC पूर्ण नसेल तर
- तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे का नाही हे तपासले जाईल.
- आधार क्रमांक पात्र यादीत असल्यास पुढील प्रक्रिया करता येईल.
पुढील टप्पा – पती किंवा वडिलांची माहिती
लाभार्थ्याने आपल्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच Captcha नमूद करावा. संमती देऊन Send OTP करावे. मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करावा.
जात प्रवर्ग निवड व अटी मान्य करणे
यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल.
तसेच खालील दोन अटींना संमती द्यावी लागेल –
- माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नियमित/कायम कर्मचारी नाहीत, तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
या अटी मान्य करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि शेवटी Submit करावे.
Ladaki Bahin Yojana E-KYC : अंतिम टप्पा
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्क्रीनवर संदेश दिसेल –
“Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.”
Ladaki Bahin Yojana E-KYC प्रक्रिया का आहे महत्त्वाची?
- e-KYC न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- वेळेत e-KYC केल्यास महिलांना आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
- संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्याने कुठेही फिरावे लागत नाही.
सर्व पात्र महिलांनी तातडीने e-KYC प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास पुढे कोणत्याही अडचणी येणार नाहीत. E-KYC प्रक्रिया पुढील दोन महिने चालणार आहे. ही प्रक्रिया पुर्ण करणाऱ्या महिला भगिनींना या योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे.