Krushi Mantri Maharashtra 2025 : दत्तामामा भरणे बनले महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री !

Krushi Mantri Maharashtra 2025 : पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री (krushi mantri) माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे ऑनलाइन रम्मी खेळत असतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता.त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली होती.कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात होती.कोकाटे प्रकरण सरकारची डोकेदुखी वाढवणार असे दिसताच महायुती सरकारने माणिकराव कोकाटेंना कृषिमंत्रीपदावरून (Agriculture Minister of Maharashtra) पायउतार केले. त्यांच्या जागी इंदापूरचे राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. (Dattatray Bharane Maharashtra New Krushi Mantri 2025)

Krushi Mantri Maharashtra 2025, Controversial Minister Manikrao Kokate's Agriculture Minister's post has been cancelled, Dattamama Bharane has become the new Agriculture Minister of Maharashtra,

शेतकऱ्यांबद्दल नेहमी असंवेदनशील बोलणे, सतत वादग्रस्त वक्तव्य करणे या कारणांमुळे चर्चेत असलेल्या कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्री पदावरून पायउतार करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय (मामा) भरणे यांच्याकडे कृषिमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण हे खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. कोकाटेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा न घेता त्याच्याकडील खात्याची आदलाबदल करून कोकाटे प्रकरण शमवण्याची खेळी सरकारकडून खेळण्यात आली आहे. नवे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जाणून घेऊयात!

माणिकराव कोकाटे आणि वाद

प्रत्येक महिना एक वाद असा त्यांचा स्कोर राहिला. कधी ‘कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली आहे.’ अशा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर त्यांनी पिकांच्या ढेकाळाचे पंचनामे करायचे का? असे विधानही केले होते. तर ‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया पीकविमा देतो,’ असे वक्तव्य त्यांनी केले.

कर्जमाफीचे पैसे शेतकरी शेतासाठी न वापता त्या पैशात साखरपुडा आणि लग्न करतो, असे देखील कोकाटे यांनी एका शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी विचारल्यानंतर म्हटले होते. तसेच नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना दोषी ठरवते म्हटले होते की, चांगला भाव मिळाला की सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतो. त्यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतो.

अगदी रमी खेळतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही कोकाटे शासन भिकारी आहे, असे विधान करून गेले. त्यामुळे कोकाटेंना हटवलं जाणार हे निश्चित झाले होते. आता नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवतील का? की त्यांचेही नाव वादग्रस्त म्हणून गणले जाणार हे येणारा काळच सांगेल.

कोण आहेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे?

छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे कृषिमंत्री या वाटचालीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भरभक्कम पाठबळ भरणेंना मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश सर्व महत्वाच्या संस्थांवर भरणेंनी संधी देण्यात अजितदादांनी कधीही हात आखडता घेतला नाही. त्यातूनच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांसारख्या बड्या नेत्याशी दोन हात करण्यासाठी अजितदादांनी मोठी ताकद भरणेंच्या पाठीशी उभी केली आणि राज्याच्या कृषिमंत्रीपदापर्यंत त्यांना पोचवले.

दत्तात्रेय भरणे हे इंदापूर तालुक्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव करून निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याऐवजी पुणे जिल्ह्यातून दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. महायुती सरकारमध्ये भरणेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. पण, कमी महत्वाच्या खात्यामुळे ते नाराज होते. अडवळणाने त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रेय भरणेंची (Dattatray Bharane) राजकीय कारकिर्द एकाच संस्थेतून सुरू झाली हेाती. दोघेही इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक होते. पुणे जिल्हा बॅंकेवरही दोघांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुढे अजित पवार हे राज्याच्य राजकारणात रमले. पण ते भरणेमामांना विसरले नव्हते. त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत संधी दिली आणि झेडपीचे अध्यक्षही केले.

तत्पूर्वी विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत दत्तात्रेय भरणे यांनी काँग्रेस आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्याने ही जागा तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सुटली होती. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरणे यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी भरणेवाडीत त्यांच्याघरी अभूतपूर्व प्रसंग घडला होता. निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यावेळी अजितदादा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी अजित पवार यांनी भरणे यांना २०१२ मध्ये लाल दिव्याची गाडी दिली होती. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संपूर्ण मोकळीक भरणे यांना देण्यात आली होती. आगामी २०१४ ची विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुरेपूर वापर भरणेंनी केला आणि झालेही तसेच. दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि पुरेपूर तयारी केलेल्या भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून विधानसभा गाठली.

भरणेंनी २०१४ नंतर मागे वळून पाहिलेच नाही. पुढे २०१९ च्या निवडणुकीतही भरणेंसाठी अजितदादांनी ठोकाची भूमिका घेतली हेाती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये भरणे हे पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. तसेच सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.

भरणेंनी २०२४ मध्ये हॅट्‌ट्रीक केली आणि महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि माणिकराव कोकाटेंचे ऑनलाईन रमी खेळणे भरणेंच्या पथ्यावर पडले आणि कृषिमंत्रीपदासारख्या मोठ्या खात्याची लॉटरी लागली. भरणेंच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अजितदादा पवार हे सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पाठबळावर दत्तात्रेय भरणे यांनी कृषिमंत्रीपदापर्यंत मजली मारली आहे. पण कृषिमंत्रीपद हे संवदेनशील खाते असून भरणेंनी जपूनच वागावे आणि बोलावे लागणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकीय कारकिर्द

  • १९९२ : श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक
  • १९९८ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक
  • २००० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन
  • २००३-०८ : श्री छत्रपती कारखान्याचे चेअरमन
  • २००९ : विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा अपक्ष म्हणून लढवली (पराभूत)
  • २०१२-१४ : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय आणि झेडपीचे अध्यक्ष बनले
  • २०१४ : विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवली आणि जिंकली
  • २०१९ : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री, सोलापूरचे पालकमंत्री
  • २०२४ : महायुती सकारमध्ये क्रीडा विभागाचे कॅबिनेट मंत्री
  • जुलै २०२५ : राज्याचे कृषिमंत्री

कृषिमंत्रीपदी निवड होताच दत्तामामा भरणे काय म्हणाले ?

एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.

शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असा शब्द नवे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टद्वारे राज्यातील जनतेला दिला आहे.

Who is the new krushi mantri in Maharashtra?

Maharashtra new Agriculture Minister name is Dattatray Bharane. Dattamama Bharane is known as a very trusted aide of Deputy Chief Minister Ajit Pawar.

Who is the new Krishi Mantri?

Maharashtra New Krushi Mantri name is Dattatray (Mama) Bharane. Agriculture Minister Manikrao Kokate was embroiled in a major controversy during the monsoon session 2025, Minister Dattatray Bharane has been selected as Maharashtra state new Agriculture Minister in 2025. Dattamama Bharane is known as a very trusted aide of Deputy Chief Minister Ajit Pawar.

नवीन कृषी मंत्री कोण आहेत?

महाराष्ट्राचे नवीन कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे हे आहेत. ते राष्ट्रवादीचे इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनात मोठ्या वादात सापडल्याने त्यांच्या जागी इंदापुरचे आमदार व मंत्री दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांची राज्याचे नवे कृषि मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.दत्तामामा भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

Who is the agriculture minister of India in 2025?

Former Chief Minister of Madhya Pradesh and MP Shivraj Singh Chouhan is the current Agriculture Minister of India.