Karmala DYSP Anjana Krishna IPS : कुर्डू अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २० जणांविरोधात गुन्हे दाखल, अजित पवारांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस ॲक्शन मोडवर
Karmala DYSP Anjana Krishna IPS : अवैध मुरूम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) अंजना कृष्णा यांना कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अजितदादांनी (ajit pawar) आयपीएस अंजना कृष्णा (ips anjana krishna) यांना फोनवर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंजना कृष्णा (Anjana Krishna ips) ह्या निडरपणे अजितदादांशी भिडल्या, या संवादाचा व्हिडिओ (viral video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दबंग महिला पोलिस अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे जनतेकडून कौतूक होत आहे. तर अजितदादांवर जोरदार टीका केली जात आहे. आता कुर्डू (Kurdu news) प्रकरणात २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईल फोनवरुन तंबी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करणे यामुळे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरु असल्याची माहिती आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई सुरु केली. दरम्यान गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला.कार्यकर्त्यांच्या फोनवरुन अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई करु नका असे म्हणत तंबी दिली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप, संतोष कापरे, अण्णा ढाणे यांच्यासह १५ ते २० जणांवर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर ३ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.