जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा कर्जत भाजपमधील महत्वाचे राजकीय नेते गणेश पालवे यांच्या खांद्यावर पक्षाने सलग दुसर्यांदा मोठी जबाबदारी सोपवली आहे.पालवे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सलग दुसर्यांदा जिल्हास्तरावर काम करण्याची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली आहे.या निवडीबद्दल पालवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

लाल मातीच्या आखाड्यात पैलवान म्हणून नावलौकिक मिळवलेल्या गणेश पालवे हे राजकारण व समाजकारणात सक्रिय असलेले युवा नेतृत्व आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते कर्जत तालुका भाजपात सक्रिय आहेत. शांत, संयमी,अभ्यासू आणि वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जातात. पक्षात सक्रीय असताना त्यांनी तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम केले. हे काम करताना पक्षाची विचारधारा त्यांनी घराघरांत पोहोचवली. या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची भटक्या विमुक्त जाती-जमातींचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. पहिल्या कार्यकाळात पालवे यांनी चांगले काम केले. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांना जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.
प्रामाणिकपणा, संघर्षसिद्धता, वचनपूर्ती आणि लोकसंग्रह या बळावर ते समाजकारण आणि राजकारण सक्रीय आहेत. गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दिन दलित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी याकरिता त्यांचा नेहमी पाठपुरावा सुरू असतो.
गणेश पालवे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.