जामखेड : जामखेडकरांनी रोहित पवारांना नाकारले, सत्तेची सुत्रे भूमिपुत्राच्या हाती, प्रा. राम शिंदेंच्या लाटेत रोहित पवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत जामखेडकरांनी रोहित पवारांच्या (Rohit Pawar) उमेदवारांचा  दारूण पराभव केला. जनतेने रोहित पवारांना साफ नाकारत भूमिपुत्र तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नगरपरिषदेची सत्ता भाजपकडे सोपवली आणि नवा इतिहास लिहिला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करत जामखेड शहरातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य आणि भूमिपुत्राला बळ दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. (Jamkhed Nagar Parishad Election Results 2025)

Jamkhedkar rejected Rohit Pawar, reins of power are in hands of bhumiputra, Rohit Pawar's dreams are shattered in wave of Ram Shinde, jamkhed nagarparishad election results 2025 Live, jamkhed nagarsevak list,

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्वाधिक १५ जागा जिंकून नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. राम शिंदेंच्या लाटेत रोहित पवारांना अवघ्या ५ जागा जिंकता आल्या.या निवडणुकीत रोहित पवारांनी केलेल्या विखारी अन् विषारी प्रचाराला बळी न पडता जनतेने प्रा राम शिंदे यांच्या विकासात्मक व्हिजनला साथ दिली आणि आम्ही विकासासोबत आहोत हेच या निकालातून दाखवून दिले. या निवडणुकीत प्रा राम शिंदे यांच्या लाटेत रोहित पवारांच्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला आहे.

जामखेड नगरपरिषद स्थापनेनंतर दुसऱ्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर २१ रोजी जनतेचा कौल समोर आला. जनतेने भाजपवर पुर्ण विश्वास दाखवत बहुमताने सत्ता सोपवली. यंदा पार पडलेली जामखेड नगरपरिषद निवडणूक राज्यात गाजली. या निवडणुकीत प्रा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा सामना पुन्हा रंगला होता. दोन्ही नेत्यांनी जामखेड शहरात तळ ठोकून जोरदार प्रचार केला होता.

या निवडणुकीत रोहित पवारांनी भाजप विरोधात आखलेली रणनिती सपशेल अपयशी ठरली. तर प्रा राम शिंदे यांनी अतिशय शांतपणे राबवलेली रणनिती प्रभावी आणि निर्णायक ठरली. शिंदे यांचा प्रत्येक डाव यशस्वी ठरला. टोकाची टीका टिप्पणी, विखारी प्रचार न करता, विकासाच्या मुद्द्यावर शिंदे यांनी जनतेची मने जिंकली. म्हणूनच जनतेने भाजपच्या उमेदवारांना भरघोस मते देत विजयी केले. हेच या निकालातून अधोरेखित होत आहे.

प्रा राम शिंदे यांनी जामखेड नगरपरिषदेच्या सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामखेडला आणले होते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी जामखेड शहराच्या सर्वांगिण विकासाचा शब्द दिला होता.भाजपने संपुर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली. जनतेने भाजपच्या याच भूमिकेला साथ देत नगरपरिषदेची सत्ता सोपवली.

यंदा जामखेड नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार होता. या पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत ९ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी सर्वाधिक ९७५४ मते घेत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी रोहित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात (६०७२ मते) यांचा ३६८२ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार जैनब वाहेद कुरेशी यांनी तिसऱ्या नंबरची ३०९५ मते घेतली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर यांनी २४०७ मते घेतली. त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व २४ नगरसेवक यांची पक्षनिहाय यादी खालील प्रमाणे (Jamkhed Nagarsevak List)

भाजपचे विजयी उमेदवार
1) सुमन अशोक शेळके (प्रभाग 1)
2) श्रीराम अजिनाथ डोके (प्रभाग 1)
3) ॲड प्रविण विठ्ठल सानप (प्रभाग 2)
4) पोपट दाजीराम राळेभात (प्रभाग 3)
5) सिमा रविंद्र कुलकर्णी (प्रभाग 3)
6) प्रा विकी धर्मेंद्र घायतडक (प्रभाग 4)
7) प्रांजल अमित चिंतामणी (प्रभाग 4)
8) हर्षद भाऊसाहेब काळे (प्रभाग 5)
9) नंदा प्रविण होळकर (प्रभाग 7)
10) मोहन सिताराम पवार (प्रभाग 7)
11) वैशाली अर्जुन म्हेत्रे (प्रभाग 9)
12) तात्याराम रोहिदास पोकळे (प्रभाग 9)
13) संजय नारायण काशिद (प्रभाग 11)
14) आशाबाई बापू टकले (प्रभाग 11)
15) जया संतोष गव्हाळे (प्रभाग 12)

राष्ट्रवादी (SP) चे विजयी उमेदवार
1) प्रिती प्रशांत राळेभात (प्रभाग 2)
2) मेहरून्नीसा शफी कुरेशी (प्रभाग 10)
3) वसीम इसाक सय्यद (प्रभाग 10)
4) हिना ईस्माईल सय्यद (प्रभाग 8)
5) राजेंद्र आजिनाथ गोरे (प्रभाग 8)

वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार
1) ॲड अरूण हौसराव (प्रभाग 6)
2) संगिता रामचंद्र भालेराव (प्रभाग 6)

शिवसेना विजयी उमेदवार
वर्षा कैलास माने (प्रभाग 5)

राष्ट्रवादी विजयी उमेदवार
महेश भारत निमोणकर (प्रभाग 12)