जामखेड : नान्नज प्राणघातक हल्ला प्रकरणी आंबेडकरी समाज आक्रमक, आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा.. सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांचा प्रशासनाला मोठा इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील साळवे कुटुंबावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद जामखेड तालुक्यात उमटू लागले आहेत. या घटनेमुळे आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झाला. याप्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी,अन्यथा जामखेड शहर बंद ठेऊ, असा आक्रमक पवित्रा जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले आणि आंबेडकरी समाजाने घेतला आहे. याबाबत सदाफुले यांनी जामखेड पोलिस प्रशासनाला आज २६ रोजी निवेदन दिले आहे.

Jamkhed, Ambedkar community is aggressive in Nannaj attack case, arrest accused immediately otherwise, Social activist Vicky Sadafule's big warning to administration

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रविवारी एका टोळक्याने आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला. या हल्ल्यात आरोपींना गज, काठ्या, तलवारी व कोयत्यांचा वापर केला होता. या घटनेत ७ जण जखमी झाले आहेत. यातील तिघांना पुणे व नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या पत्नी, मूलगा, पुतण्या व कुटुंबातील इतर सदस्यांवर १४ आरोपींनी प्राणघातक हल्ला केला.सुनिल साळवे यांचा पुतण्या अभिजित संपत साळवे याच्यावर ससुन रुग्णालय पुणे येथे तर साळवे यांची पत्नी व मुलगा यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

साळवे कुटूंब प्राणघातक हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद आंबेडकरी समाजात उमटू लागले आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी आंबेडकर समाज आक्रमक झाला आहे. घटना घडून दोन उलटून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. येत्या आठ दिवसांत सर्व आरोपी गजाआड न झाल्यास जामखेड शहर बंदचे अंदोलन हाती घेण्याचा तीव्र इशारा जामखेड शहर आंबेडकरी समाज व सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले यांनी दिला आहे. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना याबाबतचे निवदेन सदाफुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज २६ रोजी दिले आहे.

या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले,भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले,आतिश पारवे, बाबासाहेब सोनवणे अनिल जावळे,किशोर कांबळे,अनिल सदाफुले, सचिन (जाॅकी) सदाफुले,अक्षय घायतडक, प्रतिक निकाळजे, लखन मोरे, काशिनाथ सदाफुले आदींच्या सह्या आहेत.