जामखेड : जवळा, खर्डा, साकत गटात जनतेच्या पसंतीचे उमेदवार कोण ? जामखेड टाइम्सच्या सर्वेत सहभागी व्हा आणि निवडा तुमच्या पसंतीचा उमेदवार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे.आता सर्वांच्याच नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. निवडणूकीच्या हालचाली वाढल्याने इच्छूक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात जोरदार चाचपणी हाती घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर जामखेड टाइम्सने जनतेचा कल जाणून घेण्यासाठी २५ ऑगस्टपासून ऑनलाइन सर्वेक्षण हाती घेतले आहे.त्यास वाचकांसह जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.आता या सर्वेक्षणातून कोण होणार जनतेच्या पसंतीचा उमेदवार ? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जामखेड तालुक्यात यंदा होण्याऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जवळा,खर्डा व साकत असे ३ जिल्हा परिषद गट तर जवळा,अरणगाव, खर्डा, दिघोळ, साकत शिऊर असे ६ पंचायत समिती गण निश्चित झाले आहेत. त्यानुसार सर्वपक्षीय इच्छूक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात चाचपणी हाती घेतले आहे. जुन्या व नव्या नेत्यांकडून निवडणूकीच्या मैदानात नशिब आजमवण्याच्या दृष्टीने रणनिती राबवण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे गावोगावचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघू लागले आहे.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झालेल्या इच्छूकांबाबत जनतेच्या मनात काय आहे ? कोणता इच्छूक उमेदवार जनतेच्या पसंतीस उतरत आहे ? हे जाणून घेण्यासाठी जामखेड टाइम्सच्या वतीने २५ ऑगस्टपासून ऑनलाइन सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण पुढील चार दिवस म्हणजेच ३० ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत चालणार आहे.
या सर्वेक्षणातून गट आणि गणात जनतेच्या पसंतीचा उमेदवार नेमका कोण आहे ? जनतेला कोणता उमेदवार हवा आहे हे जाणून घेण्याचा जामखेड टाइम्सचा प्रयत्न असणार आहे. जामखेड टाइम्सच्या वाचकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांच्या समर्थकांनी या सर्वेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या पसंतीच्या उमेदवारास भरभरून मतदान करावे.
तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी खाली दिलेल्या तीन पैकी एका गटाच्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा आणि सर्वेक्षणात सहभाग नोंदवा. (आपले मत गुप्त राहील)
जवळा गट सर्वेक्षण लिंक
खर्डा गट सर्वेक्षण लिंक
साकत गट सर्वेक्षण लिंक
ऑनलाइन सर्वेक्षणात असा घ्या सहभाग
जामखेड टाइम्सने तीन जिल्हा परिषद गटनिहाय गुगल फाॅर्मच्या ऑनलाइन लिंक तयार केल्या आहेत. या लिंकवर क्लिक करून सर्वात आधी तुम्ही तुमच्या आवडीचा पक्ष कोणता हे लिहायचे आहे, त्यानंतर जिल्हा परिषद गट व गणातील तुमच्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर आपले मत सबमिट करायचे आहे.