जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 : “प्रभाग ११ मध्ये ‘सागरभाऊ लाट’ – उमेदवारीपूर्वीच मैदान झाले सागरमय!”

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषद निवडणूकीमुळे सर्वच प्रभागातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अश्यातच प्रभाग ११ मधील राजकीय वातावरण चांगलेच टाईट झाल्याचे चित्र आहे. या प्रभागातील भाजपचे संभाव्य उमेदवार सागर भाऊ टकले यांनी सर्वच पातळ्यांवर आघाडी घेत वातावरण ‘सागरमय’ करून टाकले आहे. त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. भाजपने सागरभाऊ टकले या तरूण तडफदार युवा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

Jamkhed Nagar Parishad Election 2025,  Sagarbhau Wave’ in Ward 11, field became oceanic even before nomination, jamkhed latest news,

जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. शहरातील प्रभाग ११ मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.अश्यातच या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष तथा विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे शिलेदार पै सागरभाऊ टकले यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा धडाका लावला आहे. सागरभाऊंच्या पाठीशी जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात एकवटत चालला आहे.

प्रभाग ११ मध्ये सध्या ‘सागरभाऊ लाट’ उसळल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्याआधीच मैदान पूर्णपणे सागरमय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार सागरभाऊ टकले यांनी गेल्या काही महिन्यांपासून राबवलेल्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे आणि जबरदस्त जनसंपर्क मोहिमेमुळे त्यांना दिवसेंदिवस जनतेचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. तरुणाईपासून ते महिला वर्गापर्यंत, सर्व स्तरांतील जनतेचा ठाम कौल “सागरभाऊंनाच उमेदवारी द्यावी!” असा उमटू लागला आहे.

सागरभाऊ टकले यांच्याकडे मोठी वोटबँक आहे. प्रभागासह शहरात त्यांना मानणारा मोठा युवावर्ग आहे. त्याचबरोबर जनतेच्या अडी अडचणीत मदतीसाठी तत्पर असलेला युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. गोरगरिबांच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्या सागरभाऊ टकले यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मोठी मागणी प्रभागातील युवावर्गासह जनतेतून होत आहे. विशेषतः महिला वर्गातून सर्वाधिक मागणी होत आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन भाजपकडून सागरभाऊ टकले यांनाच राजकीय बळ दिले जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सागर भाऊ टकले हे प्रभाग ११ मधील भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या लोकाभिमुख कामांमुळे आज प्रभागातील जनतेत त्यांच्या नावाबद्दल अपार विश्वास निर्माण झाला आहे.गोरगरीब, शेतकरी, महिला आणि युवक या सर्व घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात ‘सागरमय वातावरण’ निर्माण झाले आहे.

जनसंपर्क मोहिमा, लोकाभिमुख उपक्रम आणि प्रामाणिक वर्तनामुळे सागर भाऊ हे जनतेच्या मनातील विश्वासू चेहरा म्हणून उभे राहिले आहेत. सागर भाऊंसारख्या तळागाळात काम करणाऱ्या उमेदवारामुळे भाजपला प्रभाग ११ मध्ये काम करणारा, प्रश्नांची सोडवणूक करणारा, जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, होतकरू, अभ्यासू आणि निडरपणे काम करणारा कर्तृत्ववान उमेदवार मिळणार आहे, त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी जनतेतून जोरदारपणे होत आहे.