जामखेड : लेहनेवाडी शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण मार्गाचा दर्जा;सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, नियोजित कांदा मार्केटसाठी लेहनेवाडीचा रस्ता ठरणार गेमचेंजर – शरद कार्ले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लेहनेवाडीकरांसाठी एक आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे.राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या लेहनेवाडीच्या शिवरस्त्याला सरकारकडून ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाला आहे. विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हे मोठे काम मार्गी लागले आहे. या निर्णयामुळे लेहनेवाडी आता थेट राष्ट्रीय महामार्ग ५४८ D ला जोडली जाणार आहे.तसेच कांदा मार्केटसाठी लेहनेवाडीचा हा रस्ता गेमचेंजर आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांनी दिली.

जामखेड ते लेहनेवाडी या तीन किमी अंतराच्या रस्त्याला ग्रामीण रस्त्याचा दर्जा मिळाला आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या रस्त्यामुळे दळणवळण वाढणार असून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेणे सोईस्कर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेहनेवाडी ते जामखेड हा रस्ता रस्ते विकास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत पत्र देखील प्राप्त झाले होते. सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासाठी शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा केला. सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रस्ते विकास योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता हा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रस्त्यापासून जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचे १५ एकर क्षेत्र आहे.या ठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीमाल आणि कांदा थेट कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दळणवळणाचा प्रश्न मिटणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.या रस्त्यामुळे जामखेड बाजार समितीच्या प्रस्तावित कांदा मार्केट उभारण्यास मोठे बळ मिळणार आहे.
जामखेडला मिळणार नवा ‘मिनी बायपास’; कांदा मार्केटसाठी लेहनेवाडीचा रस्ता ठरणार गेमचेंजर!
लेहनेवाडी ते जामखेड रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समितीची 15 एकर जागा आहे. त्याठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. कांदा मार्केटसाठी लेहनेवाडीचा रस्ता ठरणार गेमचेंजर! ठरणार आहे. या रस्त्यामुळे कांदा मार्केटला कांदा आणणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. हा एक प्रकारे जामखेड शहराच्या बाहेरून मिनी बायपास होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. सर्व शेतकरी बांधव व लेहनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रा राम शिंदे साहेबांचे मनापासून आभार !