जामखेड गोळीबार प्रकरण : सागर मोहळकर प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, कोथरूड कनेक्शन उघडकीस

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sagar Mohalkar Case : जामखेड शहरात बुधवारी (४ रोजी) सायंकाळी कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर (Sagar Mohalkar case) याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे कोथरूड कनेक्शन उघड झाले आहे. एलसीबीने या प्रकरणातील मुख्य आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. हल्ल्याचा कट जामखेड व पुण्यातील आरोपींनी रचल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. (Jamkhed golibar prakaran)

Jamkhed firing case, Main accused in Sagar Mohalkar case arrested, major action by local crime branch, pune Kothrud connection exposed, Abhimanyu pote, crime news today

जामखेड येथील कुख्यात गुंड सागर मोहळकरवर गोळीबार करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड तालुक्यातील झिक्री या गावातून जेरबंद केला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जिवंत काडतूसे असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अभिमन्यु महादेव पोते (वय २४, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याने आपल्या इतर साथीदारांसह सागर मोहळकर याला ठार मारण्याचा कट रचला होता, अशी कबुली पोते याने दिली आहे.या कटासाठी हल्लेखोरांनी गावठी कट्ट्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. ४ मार्च रोजी अभिमन्यू पोते याने सागर मोहळकर याच्या हालचालीची माहिती आपल्या साथीदारांना दिली आणि त्यानंतर मोहळकरवर जीवघेणा गोळीबार करण्यात आला.

​आरोपींचे कोथरूड कनेक्शन उघड

​या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, त्यातील बहुतांश आरोपी पुण्याच्या कोथरूड भागातील आहेत. मोहळकर प्रकरणातील कोथरूड कनेक्शन समोर आल्याने आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

  • फरार आरोपींची नावे:
  • चार्ली ऊर्फ माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर साठे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे)
  • रोहित विठ्ठल आखाडे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे)
  • चिन्या (पूर्ण नाव अज्ञात, रा. कोथरूड, पुणे)
  • ​हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या आरोपींचा कोणत्या गँगशी संबंध आहे? याचा पोलिस वेगाने तपास करत आहेत.

​काय आहे नेमकं प्रकरण ?

​४ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास जामखेड शहरातील नुराणी काॅलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर झाला होता. त्याच्या चार ते पाच गोळ्या घुसल्या असल्याचे समोर आले होते. गोळीबारामुळे गंभीर जखमी असलेल्या मोहळकर याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या प्रकरणी सागरचे वडील किसन चांगदेव मोहळकर यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांचे चार पथके कार्यरत होते.

पोते सापडला झिक्रीत!

स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा वेगाने तपास करत होती. घटनास्थळ आणि परिसरातील माहिती जमा करुन तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. त्यांच्या या तपासाला मोठे यश मिळाले आहे. अभिमन्यू पोते हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे समजताच त्याच्या जामखेड तालुक्यातील झिक्री परिसरातून मुसक्या आवळण्यात आल्या आहोत. या प्रकरणातील फरार आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांना कंबर कसली आहे. लवकरच सर्व फरार आरोपी जेरबंद होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने सदर आरोपीस पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या सुपूर्द केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहळकरवर कोणी व का हल्ला केला हेही निष्पन्न झाल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून जामखेडमध्ये सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ही धडाकेबाज कारवाई सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी पार पाडली. पा पथकात सपोनि/हरिष भोये, पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णू भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे सह आदींचा समावेश होता.