जामखेड: ३ जिल्हा परिषद गट व ६ पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर, कोणत्या गणात कोणत्या गावांचा समावेश ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने या निवडणूकांची जय्यत तयारी हाती घेतली आहे.प्रशासनाने जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यात ३ जिल्हा परिषद गट व ६ पंचायत समिती गण निश्चित झाले आहेत.

प्रशासनाने १४ जुलै रोजी जि. प. गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावर प्रशासनाने हरकती नोंदवण्यासाठी २१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. हरकती आणि सुचनांवर सुनावणी पुर्ण झाल्यानंतर प्रशासनाने ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये व विभागीय आयुक्त नाशिक यांच्या मान्यतेनुसार आज २२ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. ही प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करून जाहीर करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट
- ७३ साकत गट – लोकसंख्या ३६,२९८
- ७४ खर्डा गट – लोकसंख्या ४०,६३०
- ७५ जवळा गट – लोकसंख्या ४१,९०१
जामखेड तालुक्यातील पंचायत समिती गण
- १४५ शिऊर गण (लोकसंख्या १८,२८४)
- १४६ साकत गण (लोकसंख्या १८,०१४)
- १४७ दिघोळ गण (लोकसंख्या १९,५७८)
- १४८ खर्डा गण (लोकसंख्या २१,०५२)
- १४९ अरणगाव गण (लोकसंख्या २०,४९४)
- १५० जवळा गण (लोकसंख्या २१,४०७)
कोणत्या गणात कोणत्या गावांचा समावेश?
१४५ शिऊर गण (लोकसंख्या १८,२८४)
मोहा, सावरगाव, शिऊर, काटेवाडी, सारोळा, खुरदैठण, पाडळी, धोंडपारगाव, राजेवाडी, झिक्री, खांडवी, डिसलेवाडी, कुसडगाव, सरदवाडी
१४६ साकत गण (लोकसंख्या १८,०१४)
कोल्हेवाडी, पिंपळवाडी, साकत, देवदैठण, नाहुली, नायगाव, राजुरी, डोळेवाडी, पिंपळगाव आळवा, घोडेगाव, आनंदवाडी, लोणी
१४७ दिघोळ गण (लोकसंख्या १९,५७८)
धामणगाव, तेलंगशी, जायभायवाडी, बांधखडक, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, मोहरी, बाळगव्हाण, वाकी, पिंपळगाव उंडा, वाघा, गुरेवाडी, महारुळी, आपटी
१४८ खर्डा गण (लोकसंख्या २१,०५२)
पांढरेवाडी, दरडवाडी, मुंगेवाडी, नागोबाचीवाडी, खर्डा, सातेफळ, तरडगाव, वंजारवाडी, दौंडाचीवाडी, पोतेवाडी, जवळके, सोनेगाव, धनेगाव
१४९ अरणगाव गण (लोकसंख्या २०,४९४)
डोणगाव, पारेवाडी, अरणगाव, पाटोदा, भवरवाडी, खामगाव, धानोरा, वंजारवाडी, फक्राबाद, बावी, हसनाबाद, पिंपरखेड, रत्नापूर, सांगवी, कवडगाव, गिरवली
१५० जवळा गण (लोकसंख्या २१,४०७)
हळगाव, आघी, मतेवाडी, जवळा, मुंजेवाडी, चोभेवाडी, बोर्ले, नान्नज, चोंडी

1. जामखेड तालुक्यात किती जिल्हा परिषद गट आहेत ?
जामखेड तालुक्यात एकुण तीन जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये जवळा, खर्डा व साकत या तीन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे.
2. जामखेड तालुक्यात किती पंचायत समिती गण आहेत ?
जामखेड तालुक्यात एकुण सहा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये जवळा, अरणगाव, खर्डा, दिघोळ, साकत, शिऊर या सहा गणांचा समावेश आहे.