जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या २५ दिवसांपासून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांच्या मालिकेत आणखी एक विधायक उपक्रम पार पडला. जामखेड (Jamkhed) तालुक्यातील फक्राबाद (Fakrabad) प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना ट्रॅक सुटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सभापती प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहायक अजय सातव व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात आला. या विधायक उपक्रमाचे नागरिकांमधून कौतूक होत आहे. (Republic Day 2026 News)

प्रजासत्ताक दिनी शाळेच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. नव्या ट्रॅक सूटमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबत क्रीडा साहित्य व पोशाख मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शाळेत उपस्थिती सुधारावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजक अजय सातव यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थकांकडून मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात असून, त्याला नागरिकांचा सकारात्मक असा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फक्राबाद येथील हा उपक्रमही त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे नागरिकांनी नमूद केले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून, अजय सातव मित्रमंडळाच्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
यावेळी मार्केट कमिटीचे संचालक नारायण जायभाय, एपीआय सोमनाथ लोंढे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र हजारे,साळुंके सर, चौधरी सर, गाडे मॅडम, साबळे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद उबाळे. उपाध्यक्ष महेंद्र जायभाय गणगे साहेब, महादेव जायभाय, भगवान उबाळे,मिठू राऊत, मकरंद राऊत,बाळासाहेब जायभाय, उत्तम शिंदे, नानासाहेब आढाव, परसराम राऊत,टिपू राऊत, कृष्णा उबाळे,ओंकार पोपळे, संतोष राऊत, रणजित राऊत, पोलिस पाटील योगेश जायभाय, सौरभ मोहळकर, सागर लोंढे, ज्ञानेश्वर राऊत (माऊली), कृष्णा राऊत, बंटी उबाळे,समाधान राऊत, ऋषिकेश राऊत सह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अजय सातव मित्रमंडळाच्या या सामाजिक पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.