जामखेड : साळवे कुटुंब हल्ला प्रकरणात मोठी घडामोड, एलसीबीने आवळल्या पाच जणांच्या मुसक्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा: नान्नज येथील साळवे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात बुधवारी २७ रोजी मोठी घडामोड समोर आली आहे. घटनेनंतर फरार झालेल्या १४ पैकी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने राजुरी परिसरात ही कारवाई केली आहे. नान्नज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ६ झाली आहे. तर इतर सर्व आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके वेगाने तपास करत आहेत.

Jamkhed Breaking News, Big development in Salve family assault case, LCB arrests five people in kharda area, Nannaj jamkhed news,

२४ ऑगस्टच्या रात्री जामखेड तालुक्यातील नान्नज येथे एका टोळक्याने आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात ७ जण गंभीर झाले होते.त्यातील ३ गंभीर जखमींवर पुणे व नगर येथे उपचार सुरु आहेत.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. जामखेड तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांत सर्व आरोपींना अटक न केल्यास जामखेड शहर बंदचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा त्यांनी दिलाय तर दुसरीकडे मंगळवारी दिवसभर नान्नज ग्रामस्थांनी नान्नज घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

Jamkhed Breaking News, Big development in Salve family assault case, LCB arrests five people in kharda area, Nannaj jamkhed news,

साळवे कुटुंब प्राणघातक हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागताच या प्रकरणातील तपास पथकांनी आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला या प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. नान्नज प्रकरणातील आरोपी राजुरी शिवारात येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने राजुरीत सापळा लावत ५ आरोपींना अटक केली.

जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११९(२), ३२४(४), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५१(२), १२६(२) शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच अ.जा.ज.का.क ३(२), ३(२) (व्हीए) प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार १) वैभव विजय साबळे, वय २९ वर्षे २) कल्याण पांडुरंग मोहोळकर, वय २८ वर्षे ३) अभयसिंह किसन राजेभोसले, वय २३ वर्षे ४) नरेंद्र शहाजी सोनवणे, वय २३ वर्षे ५) साईनाथ संपत राजपुत वय २१ वर्षे, सर्व रा. नान्नज ता. जामखेड यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. इतर फरार आठ आरोपींचा वेगाने शोध घेतला जात आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, हेड काँस्टेबल हृदय घोडके, पोलिस नाईक श्यामसुंदर जाधव, पोलिस काँस्टेबल अमोल कोतकर, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, चालक पोलिस हेड काँस्टेबल महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.