जामखेड ब्रेकिंग : खर्डा परिसरात अतिवृष्टीने उडवला हाहाकार, खैरीला महापुर, अनेक पुल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, जामखेड – तुळजापुर वाहतुक बंद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसराला अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. जामखेड – तुळजापुर मार्गावरील दरडवाडीचा पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे खैरी नदीला महापुर आलाय. खैरी धरणातून सकाळी ११ वाजेपर्यंत १७ हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. खैरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खैरी नदीच्या महापुराचा मोठा फटका परांडा तालुक्यातील गावांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावध रहावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

२६ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाने खर्डा भागात मोठा विध्वंस घडवला आहे. या भागातील शेती व रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले आहे. नद्यांना पुर आलाय. या भागातील खैरी नदीला मोठा पुर आला. खर्डा परिसरात अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. खैरी धरणातून १७ हजार क्युसेक विसर्ग सुरु, खैरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. चार दिवसांपुर्वी निर्माण झालेल्या पुर परिस्थिती सारखी परिस्थिती या भागावर ओढवली आहे.
अतिवृष्टीमुळे मोहरी नदीलाही पुर आला आहे.नदीवरील पुल पाण्याखाली गेलाय दुसरीकडे बांधखडक येथील पुलही पाण्याखाली गेला आहे.धामणगाव तेलंगशी रस्ता पाण्याखाली गेला आहे.तेलंगशी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. राजुरी भागातही प्रचंड पाऊस झाला.जामखेड खर्डा रस्त्यावरुन या भागात पाणी वाहत होते.खर्डा परिसरात पावासाने दाणादाण उडवून दिली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नांदणी नदीला पुर आला आहे.नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. जवळा गावात काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. खैरी नदीला महापुर स्थिती निर्माण झाल्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आनंदवाडीचा पुल पाण्याखाली गेला आहे.
नाहुली भागातही पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. या भागातील भिलारे वस्तीवरील पुल वाहुन गेला आहे. वस्तीचा गावाशी अंसलेला संपर्क तुटला आहे. जायभायवाडी तेलंगशी पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.जवळा येथील नांदनी नदीला महापूर आलाय. मारुती मंदिराच्या जवळ पाणी आलेले असून स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या लोकांनी सावध रहावे.
बातमी अपडेट होत आहे….