Jamiat Ulema A Hind | जामखेड तालुकाध्यक्षपदी मौलाना खलील कासमी तर शहराध्यक्षपदी हाफिज समीर

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शंभर वर्षांहून अधिक काळापासून देशाच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जमियत उलेमा ए हिंद (Jamiat Ulema A Hind) या सामाजिक संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी मौलाना खलील कासमी तर शहराध्यक्षपदी हाफिज समीर यांची आज शनिवारी संघटनेच्या तालुकास्तरीय बैठकीत निवड करण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिलेल्या जमियत उलेमा ए हिंद (Jamiat Ulema A Hind) हि सामाजिक संघटना समाजातील वंचित उपेक्षित गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच मुस्लिम समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. याशिवाय देशात नैसर्गिक आपत्ती येवो अथवा संकट येवो अश्या संकट काळात ही संघटना मदतीसाठी अग्रभागी असते. समाजात सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी ही संघटना देशात विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम सातत्याने राबवत असते.

 

Jamiat Ulema A Hind, जमियत उलेमा ए हिंद
जामखेडमध्ये जमियत उलेमा ए हिंद ची जामखेड तालुका कार्यकारणीची बैठक पार पडली

 

 

तसेच जमियत उलेमा ए हिंद (Jamiat Ulema A Hind) जामखेड शहर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हाफिज समीर तर उपाध्यक्षपदी जुबेर शेख व हाफिज मुजाहिद तसेच सचिवपदी मुफ्ती अजवद अहेमद तर सहसचिवपदी हाफिज वसीम व मजहर काझी तसेच खजिनदारपदी साजीदभाई कुरेशी यांची निवड करण्यात आली.

 

Jamiat Ulema A Hind
जमियत उलेमा ए हिंद जामखेड तालुका कार्यकारणी २०२१
Jamiat Ulema A Hind, जमियत उलेमा ए हिंद
जमियत उलेमा ए हिंद जामखेड शहर कार्यकारणी २०२१