7 हजार रूपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे दोघा कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले | Jalna ACB Trap News

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत सदस्याच्या नावाने मंजुर असलेल्या विहीर खोदकामचे अकुशल मजूर यांचे थकित मस्टर काढण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीच्या दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्याची कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ही कारवाई जालना जिल्ह्यातील भोकरदन पंचायत समितीत (Bhokardan Panchayat Samiti ACB Trap news) करण्यात आली. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Jalna ACB Trap News)

Jalna ACB two employees of Bhokardan Panchayat Samiti were caught red-handed by ACB while accepting bribe of 7 thousand rupees, Jalna ACB Trap News

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या नावे 2021 साली सार्वजनिक विहीर मंजुर झाली होती.सदर विहीर खोदकामाचे अकुशल मजूराचे थकित मस्टर काढण्यासाठी प्रशांत रामेश्वर दहातोंडे, (Prashant Rameshwar Dahatonde) वय 39 वर्ष, पद – तांत्रिक सहायक  (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता. भोकरदन, जि.जालना याने 7000 रू. लाचेची मागणी केली होती तसेच सतीश रामचंद्र बुरंगे, (Satish Ramchandra Burange) वय 29 वर्ष, पद- संगणक परिचालक (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना. यानेसुद्धा  3000 रू. लाचेची मागणी केली होती. भोकरदन पंचायत समितीच्या दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विहीर खोदाई कामाचे मस्टर काढून देण्यासाठी 10 हजाराची लाच मागितली असल्याची तक्रार 40 वर्षीय पुरूषाने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. (Jalna ACB Trap today)

सदर तक्रारीची जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले होते. त्यांतर एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई केली असता सदर प्रकरणात प्रशांत रामेश्वर दहातोंडे याने पंचा समक्ष 7 हजार रूपये पंचायत समिती कार्यालय भोकरदन येथे स्वतः स्वीकारले. तर सतीश रामचंद्र बुरंगे याने लाचेची रक्कम घेतली नाही. या सापळा कारवाई एसीबीने प्रशांत रामेश्वर दहातोंडे व सतीश रामचंद्र बुरंगे या दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध भोकरदन पोलीस स्टेशन, जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या कारवाईमुळे भोकरदन पंचायत समितीत मोठी खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे यांचा समावेश होता.

यशस्वी सापळा कारवाई

▶️ युनिट –  जालना

▶️ तक्रारदार-  पुरुष, वय 40 वर्षे

▶️ आरोपी लोकसेवक – 1. प्रशांत रामेश्वर दहातोंडे, वय 39 वर्ष, पद – तांत्रिक सहायक  (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता. भोकरदन, जि.जालना
2. सतीश रामचंद्र बुरंगे, वय 29 वर्ष, पद- संगणक परिचालक (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता.भोकरदन,जि.जालना.

▶️ लाच मागणी रक्कम – आलोसे क्र.1 ने 7000/- रुपये  व आलोसे क्र.2 ने 3000/- असे एकूण 10000 रू. लाचेची मागणी

▶️ *लाच मागितल्याचा व स्वीकारल्याचा दिनांक* – 17/07/2023

▶️ लाच हस्तगत रक्कम – 7000 रुपये

▶️  थोडक्यात हकीकत – यातील  तक्रारदार हे ग्राम पंचायत सदस्य आहेत. सदर सार्वजनिक विहीर सन 2021 मंजूर झालेली होती. सदर मंजूर विहीर खोदकाम चे अकुशल मजूर यांचे थकित मस्टर  काढण्यासाठी आलोसे क्र.1 दहातोंडे याने पंचासमक्ष 7000 रू. लाचेची मागणी केली. तसेच  आलोसे क्र.2 बुरंगे यानेसुद्धा पंचासमक्ष  3000 रू. लाचेची मागणी केली आहे. सदर प्रकरणात आलोसे  क्र.1 याने आज रोजी पंचा समक्ष 7000रू.  पंचायत समिती कार्यालय भोकरदन येथे स्वतः स्वीकारले. तर यातील आलोसे  क्र. 2 याने लाचेची रक्कम घेतली नाही. आलोसे  क्र.1 यास पंचा समक्ष स्वतः 7000 रू. स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. तर आलोसे क्रं.2 याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस स्टेशन, जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

▶️ सापळा अधिकारी व तपास अधिकारी –
किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जालना

▶️ सापळा पथक – पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे ला.प्र.वि.जालना

▶️ मार्गदर्शन अधिकारी- मा.श्री. संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि.औरंगाबाद परिक्षेत्र मो.9923023361
मा. श्री. विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि औरंगाबाद परिक्षेत्र मो. 8788644994

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
किरण  एम. बिडवे.
पोलीस उप अधीक्षक,
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जालना.
मो.नं. 7020224631
Dyspacbjalana@gmail.com
02482220252
@ टोल फ्रि क्रं. 1064