IAS Transfer Maharashtra Today: प्रशासनात मोठी खांदेपालट! अमोल येडगे, कुमार आशीर्वाद यांच्यासह २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात वरिष्ठ सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखीन २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केले आहेत. यामध्ये सोलापुर, नागपुर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक वरीष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Transfer Maharashtra Today, Big change in maharashtra administration, Transfers of 25 IAS officers, Amol Yedge, Kumar Ashirwad, Read ias transfer list with one click,

दोन दिवसांपूर्वी सिंगम अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासह सरकारने १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. गुरूवारी रात्री सरकारने २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रशासकीय आदेश जारी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, राजेंद्र भारूड यांच्यासह आदी प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच आठवड्यात एकूण ३५ सनदी अधिकाऱ्यांचे खांदेपालट झाल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

​२५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

​१. कुमार आशीर्वाद: जिल्हाधिकारी, सोलापूर येथून जिल्हाधिकारी, नागपूर पदी नियुक्ती.
२. विनय गौडा जी.सी.: जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर पदी नियुक्ती.
३. डॉ. विजय राठोड: सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC येथून जिल्हाधिकारी, कोल्हापूर पदी नियुक्ती.
४. कार्तिकयेन एस.: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची जिल्हाधिकारी, सोलापूर पदी नियुक्ती.
५. अमोल येडगे: जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदी नियुक्ती.
६. जी. श्रीकांत: आयुक्त, छत्रपती संभाजीनगर मनपा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘जल जीवन मिशन’, नवी मुंबई पदी नियुक्ती.
७. दिलीप स्वामी: जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला पदी नियुक्ती.

८. वर्षा ठाकूर-घुगे: जिल्हाधिकारी, लातूर यांची सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई पदी नियुक्ती.
९. डॉ. भारत बास्तेवाड: आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची जिल्हाधिकारी, लातूर म्हणून नियुक्ती.
१०. दीपक सिंगला: अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे यांची आयुक्त, ‘MGNREGS’, नागपूर म्हणून नियुक्ती.
११. के. मंजुलेक्ष्मी: आयुक्त, कोल्हापूर मनपा यांची अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे म्हणून नियुक्ती.
१२. डॉ. राजेंद्र भारूड: प्रकल्प संचालक (RUSA) यांची आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
१३. डॉ. प्रवीणकुमार देवरे: आयुक्त, पशुसंवर्धन यांची जिल्हाधिकारी, बुलढाणा म्हणून नियुक्ती.
१४. डॉ. मंगेश गोंदवले: व्यवस्थापकीय संचालक, MAIDC यांची जिल्हाधिकारी, गोंदिया म्हणून नियुक्ती.

१५. वसुमाना पंत: अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा यांची जिल्हाधिकारी, चंद्रपूर म्हणून नियुक्ती.
१६. प्रजित नायर: जिल्हाधिकारी, गोंदिया यांची अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
१७. वर्षा लड्डा: महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद येथून आयुक्त, अमरावती महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
१८. डॉ. किरण पाटील: जिल्हाधिकारी, बुलढाणा यांची पशुसंवर्धन आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती.
१९. सत्यम गांधी: आयुक्त, सांगली मनपा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती.
२०. संजिता मोहपात्रा: मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड मनपा म्हणून नियुक्ती.
२१. जास्मिन: सहायक जिल्हाधिकारी, राजापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर म्हणून नियुक्ती.

२२. कृष्णकांत कंवारिया: सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना म्हणून नियुक्ती.
२३. मिन्नू पी एम: मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती.
२४. अंकित: मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. छत्रपती संभाजीनगर यांची अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
२५. अंजली शर्मा: यांची आयुक्त, जालना महानगरपालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

​दोन दिवसांपूर्वी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

​१. लोकेश चंद्रा: मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय.
२. तुकाराम मुंढे: प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन.
३. आश्विनी भिडे: महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC).
४. विनीत वैद्य सिंगल: प्रधान सचिव, मृद आणि जलसंधरण विभाग.
५. लोकेश चंद्रा: मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव (पुनर्नियुक्ती/पदभार).

६. लहू माळी: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प.
७. परिमल सिंह: सचिव (कृषी), मंत्रालय.
८. विकास चंद्र रस्तोगी: अपर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग.
९. माणिक गुरसाळ: सचिव, दिव्यांग कल्याण विभाग.
१०. पृथ्वीराज बी. पी: महापालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका.
११. प्रेरणा देशभ्रतार: आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई.