IAS Transfer Maharashtra Today : मोठी बातमी ! तृप्ती धोडमिसे, अजित कुंभार, विशाल नरवडे या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोठे मिळाली नियुक्ती ?
IAS Transfer Maharashtra Today : महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. सरकारने पुन्हा एकदा भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा समावेश आहे. याशिवाय अजित कुंभार व विशाल नरवडे यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. (Trupti Dhodmise, Ajit Kumbhar, Vishal Narwade)

मागील आठवडय़ात राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आणखीन ३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
अजित कुंभार (IAS:RR:2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC) मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (IAS:RR:2019) यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
विशाल नरवडे (IAS:RR:2020) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सांगली जिल्हा परिषद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मधील अधिकाऱ्यांना पदोन्नती
सामान्य प्रशासन विभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश आज जारी केले आहेत.
यामध्ये अलिबाग माहिती कार्यालयातील किरण रामकुष्ण वाघ यांची मुंबईतील माहिती विभाग मुख्यालयात वरिष्ठ सहायक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मंगेश वरकड यांची वर्ध्यात माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील शैलजा वाघ दांदळे यांची भंडारा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश येसनकर यांची चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिजकिशोर झंवर यांची मुंबईत वरिष्ठ सहायक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.