भाजपचे संभाव्य उमेदवार सागरभाऊ टकले यांच्या रॅलीत उसळला जनसागर!प्रभाग ११ मधील जनतेकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब, आता लक्ष पक्षाच्या निर्णयाकडे !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलाय. शहरातील प्रत्येक गल्ली, चौक आणि कट्ट्यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अश्यातच सोमवारी भाजपकडून विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला. या मुलाखतीदरम्यान प्रभाग ११ मधील भाजपाचे संभाव्य उमेदवार सागरभाऊ टकले यांच्या भव्य दिव्य आणि उत्स्फूर्त रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सोमवारचा दिवस सागरभाऊ टकले या तरूण तडफदार इच्छूक उमेदवाराने गाजवला.

सोमवारी भाजपकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रभाग अकरामधील भाजपाचे संभाव्य उमेदवार सागरभाऊ टकले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या रॅलीत प्रचंड जनसागर उसळला होता. भव्य रॅलीद्वारे सागरभाऊ टकले हे मुलाखतीसाठी दाखल झाले होते.यावेळी सागरभाऊ टकले यांच्या समर्थकांनी उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. हातात भगवे झेंडे, फलक आणि घोषणाबाजी करत तरुणांसह नागरिकांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यात महिलांचा सहभागही प्रचंड होता. रॅलीत “आपला माणूस… हक्काचा माणूस!” हे घोषवाक्य आघाडीवर होतं.

सागरभाऊ टकले यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रा. राम शिंदे आणि सागरभाऊ टकले यांचे कटआऊट आणि बॅनर हातात घेतले होते. या रॅलीने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण केलं होतं. राम शिंदे यांच्या बॅनर खाली ‘आपला माणूस’ तर सागरभाऊ टकले यांच्या बॅनरखाली ‘हक्काचा माणूस’ अशी टॅगलाईन देण्यात आली होती. रॅलीतील हेच फोटो सोमवारी दिवसभर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते.

या रॅलीतून केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनच नाही, तर जनतेचा स्पष्ट कौलही दिसून आला. प्रभाग ११ मध्ये सागरभाऊ टकले यांचीच लाट असल्याचे या रॅलीने दाखवून दिले. भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी जनतेने रॅलीच्या माध्यमातून सागरभाऊ टकले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. आता सर्वांच्या नजरा पक्षाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांचा आशिर्वाद सागरभाऊ टकले यांना शंभर टक्के मिळणार अशी भावना यावेळी प्रत्येक जण बोलून दाखवत होता. सागरभाऊ टकले यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सागरभाऊ टकले यांनी प्रभाग ११ मध्ये गेल्या काही वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.नागरिकांच्या तातडीच्या गरजा ओळखून त्यांनी स्वखर्चातून अनेक लोकाभिमुख कामे पूर्ण केली आहेत. यातून त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सागरभाऊ टकले यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची पावती जनतेने त्यांना सोमवारी दिली.जनतेने निवडणूक हातात घेत सागरभाऊ यांना आपला नगरसेवक निवडला आहे. हेच या रॅलीत जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने अधोरेखित केले आहे. प्रभाग ११ मधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पक्षातही त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय जाणकारांचे मत आहे.