हृदयद्रावक : मला पण पोहता येतं असं म्हणाला अन् काळाने घाला घातला, १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू , जामखेड तालुक्यातील धानोरा येथील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धानोरा येथून एक हृदयद्रावक घटना आज (५ रोजी) समोर आली आहे. मामेबहिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. “मला पण पोहता येतं” असं म्हणत त्याने विहिरीत मारलेली उडी त्याच्या आयुष्याची शेवटची उडी ठरली, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आवेज रिजवान पठाण (Awez Rizwan Pathan) असे मयत मुलाचे नाव आहे.

Heartbreaking, 17-year-old boy drowns in well, incident in Dhanora, Jamkhed taluka, Awez Rizwan Pathan, jamkhed news today,

याबाबत सविस्तर असे की, मयत आवेज हा बुधवारी (दि. ४) जामखेड तालुक्यातील धानोरा येथे आपल्या नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आला होता.रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला.त्यानंतर आवेज हा त्याचा चुलत भाऊ आणि मित्रांसह मुक्कामासाठी नातेवाईकांकडेच थांबला होता.

Heartbreaking, 17-year-old boy drowns in well, incident in Dhanora, Jamkhed taluka, Awez Rizwan Pathan, jamkhed news today,

​दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आवेज, त्याचा चुलत भाऊ अन्वर शौकत पठाण आणि मित्र जय संतोष आरु हे तिघेजण घराजवळील विहिरीवर पोहण्यासाठी गेले. यावेळी आवेजचा भाऊ आणि मित्र विहिरीत पोहून बाहेर आले होते. मात्र, आवेज त्यांना म्हणाला की, “मला पण पोहता येते” आणि त्याने विहिरीत उडी मारली.

Heartbreaking, 17-year-old boy drowns in well, incident in Dhanora, Jamkhed taluka, Awez Rizwan Pathan, jamkhed news today,

आवेजने पाण्यात उडी मारल्यानंतर तो बराच वेळ वर आला नाही. हे पाहून त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. वस्तीवरील नातेवाईकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली आणि पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जामखेड पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

विहीर खोल असल्याने शोध घेण्यात अडथळे येत होते.

अखेर पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद यांनी २३ फूट खोल पाण्यात बुडी मारून शोध घेतला. तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास आवेजचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ऐन उमेदीच्या वयातील तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून धानोरा व अहिल्यानगर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

Heartbreaking, 17-year-old boy drowns in well, incident in Dhanora, Jamkhed taluka, Awez Rizwan Pathan, jamkhed news today,

धाडस आणि माणुसकी: रफीक सय्यद यांचा जीवाची बाजी लावून शोध!

धानोरा येथील या हृदयद्रावक घटनेत प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ हतबल झालेले असताना, पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद (वय ५४) यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले. आवेज विहिरीत बुडाल्यापासून त्याचा शोध लागत नव्हता. तब्बल २३ फूट खोल पाणी आणि विहिरीचा अंदाज नसतानाही, ५४ वर्षीय रफीक सय्यद यांनी माणुसकीच्या नात्याने विहिरीत बुडी मारली. सलग सहा तासांच्या शोधमोहिमेनंतर, जिवाची पर्वा न करता त्यांनी आवेजचा मृतदेह शोधून बाहेर काढला. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले. यांच्या या कार्याचे सर्वांनी आभार मानले.

​या बचाव कार्यात वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, माजी सरपंच बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडु सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख, पो. कॉ. जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण, पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांनी मोलाची भूमिका भूमिका बजावली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी निजाम गणी शेख, रा. धानोरा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.