Jamkhed News : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जामखेड येथे चक्काजाम अंदोलन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज (गुरुवार,२४ जुलै रोजी) जामखेड शहरातील खर्डा चौक येथे चक्का जाम अंदोलन करण्यात आले. शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा यावेळी सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी अंदोलकांनी केली. यावेळी अंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिले. अंदोलनामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. अंदोलकांच्या भावना सरकारला कळवू असे अश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
अंदोलास आम आदमी पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P), वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना उ.बा.ठा. या राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
