Gas Refilling Racket : हॉटेलच्या पार्किंगमध्ये सुरू होता ‘मृत्यूचा खेळ’; ५७ टन गॅससह २ कोटी १ लाखांचा मुद्देमाल जप्त, अहिल्यानगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Gas Refilling Racket: पुणे – अहिल्यानगर (Ahilyanagar) महामार्गावरील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग रॅकेटचा (Gas refilling racket) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५७ टन गॅससह तब्बल २ कोटी १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.ज्वलनशील गॅसचे हे अवैध रिफिलिंग अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू होते; पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.(Ahilyanagar News Today)

Gas Refilling Racket, Game of Death was going on in hotel parking, Goods worth 2 crore 1 lakh including 57 tons of gas seized, LCB action, ahilyanagar news today,

​​”नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना २३ मार्च रोजी एक खळबळजनक माहिती मिळाली. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कामरगाव शिवारात असलेल्या ‘हॉटेल रेणुका दही मिसळ’च्या पार्किंगमध्ये, चक्क HP कंपनीच्या ३ मोठ्या टँकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणी छापा टाकून गॅस माफियांच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला.” (Gas Refilling Racket)

​Gas Refilling Racket धक्कादायक वास्तव

​​”एलसीबीने धाड टाकली तेव्हा समोर आलेले दृश्य थक्क करणारे होते. अत्यंत ज्वलनशील गॅसने भरलेल्या महाकाय टँकरमधून, सुरक्षेच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅसची चोरी सुरू होती. हा प्रकार म्हणजे अक्षरश: ‘जिवंत बॉम्ब’वर बसून चाललेला खेळ होता; एका लहानशा ठिणगीनेही इथे भीषण स्फोट होऊन मोठी मानवी हानी झाली असती. हे रॅकेट केवळ सरकारी महसुलावर दरोडा टाकणारे नसून, निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणारे असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.” (Gas Refilling Racket)

​२ कोटींचा मुद्देमाल जप्त

​या कारवाईत पोलिसांनी एकूण २,०१,०९,६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात प्रामुख्याने खालील वस्तूंचा समावेश आहे:

  • HP कंपनीचा गॅस (५७.२०० टन): किंमत ३०, ४८, ५२८ रुपये.
  • ३ मोठे गॅस टँकर: किंमत १,६५,००,००० रुपये.
  • अशोक लेलँड टेम्पो: किंमत ५,००,००० रुपये.
  • भारत गॅसचे २० सिलेंडर (२भरलेले व १८ रिकामे): किंमत ६०,००० रुपये.
  • इतर साहित्य: रिफिलिंगसाठी लागणारे पाईप, नोझल आणि सील.

​गॅस रिफिलिंगच्या या बेकायदा व्यवसायात गुंतलेल्या चौघांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.(Gas Refilling Racket)

  • अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
  • १.सचिन आबा बोधले (३१) – रा. दहिवडी, ता. तुळजापूर, जि. धाराशीव.
  • २. माणिक बालाजी गुड्डे (३२) – रा. दैठणे, ता. परळी, जि. बीड.
  • ३. उल्हास जिवन कवडे (३२) – रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशीव.
  • ४. अमृत बाळासाहेब ठोकळ (३३) – रा. कामरगाव, ता.जि. अहिल्यानगर.

​कठोर कलमान्वये गुन्हा दाखल

​आरोपींविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, गॅस सिलेंडर अधिनियम २०१६ आणि स्फोटके अधिनियम १८८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या रॅकेटचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास अहिल्यानगर तालुका पोलीस करत आहेत.(Gas Refilling Racket)

केवढा हा जीवघेणा निष्काळजीपणा?

गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये रिफिलिंग करणे ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची आणि धोक्याची प्रक्रिया आहे. यासाठी विशेष प्रेशर कंट्रोलर आणि सुरक्षित यंत्रणेची गरज असते. मात्र, कामरगाव येथील धाडीत कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेता उघड्यावर, केवळ साध्या पाईप आणि नोझलच्या साहाय्याने हा प्रकार सुरू होता. गॅस गळती झाल्यास साध्या ठिणगीनेही इथे भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसर कवेत घेणारी मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा प्रकार केवळ चोरी नसून, मानवी वस्तीत ‘जिवंत बॉम्ब’ तयार करण्याचाच हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. ही घटना उघडकीस येताच संपुर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.(Gas Refilling Racket)

गॅस रिफिलिंगचे ‘आंतरराज्यीय रॅकेट’ ?

बाजारपेठेत निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा घेत गॅस माफियांच्या टोळ्या आता थेट महामार्गांवर सक्रिय झाल्या आहेत. अधिकृत यंत्रणेला चकवा देऊन टँकरमधून गॅस चोरणे आणि तो चढ्या दराने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विकणे, असा हा सुनियोजित ‘काळाबाजार’ आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे हतबल झालेले हॉटेल चालक आणि छोटे व्यावसायिक चढ्या किमतीत गॅस खरेदी करण्यास तयार असतात. याच मजबुरीचा फायदा घेत माफियांचे हे रॅकेट फोफावत असून, यामागे एखादे मोठे ‘आंतरराज्यीय रॅकेट’ असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.(Gas Refilling Racket)

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल आणि पोलीस अंमलदार संतोष खैरे यांचा समावेश होता.(Gas Refilling Racket)