ED Raid Sachin Sawant IRS : 500 कोटींच्या घोटाळ्यात ईडीच्या हाती लागले मोठे घबाड,IRS अधिकारी सचिन सावंतांकडे सापडली बेहिशोबी मालमत्ता

मुंबई: ED Raid Sachin Sawant irs : कस्टम आणि जीएसटी विभागाचे अतिरिक्त संचालक तथा आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ईडीने लखनौ (Lucknow) येथून अटक केली होती. त्यानंतर मुंबईत ईडीने छापेमारी केली होती. या प्रकरणात न्यायालयाने सावंत यांना 5 जुलै 2023 पर्यंत ईडी कोठडी (IRS Sachin Sawant ED Custody) सुनावली आहे. या प्रकरणात ईडीच्या हाती मोठे घबाड लागले आहे.

ED Raid Sachin Sawant IRS,500 Crores Scam, ED Found Unaccounted Assets of IRS Officer Sachin Sawant, Sachin Sawant latest news,IRS Sachin Sawant ED Custody,

वरिष्ठ सनदी अधिकारी सचिन सावंत यांना 500 कोटींच्या घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. ईडीने केलेल्या तपासात सावंत यांच्याकडे मोठी बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीने बुधवारी सकाळी छापा टाकला होता. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २.४५ कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

500 कोटी रुपये बेकायदेशीर रित्या वळवण्याच्या एका प्रकरणातील आरोपीने आयआरएस अधिकारी सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सीबीआयने एफआरआय दाखल होती. या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर भ्रष्टाचार आणि मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. त्यांनी सदनिका घेण्यासाठी दीड कोटी रोख स्वरुपात दिल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहेत.

त्यांची सानपाड्यातील सदनिका त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. तर गॅस त्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या पथकाने त्यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती घेतली आहे.

सावंत यांच्या बँक खात्यात तब्ब्ल १.२५ कोटी रुपये सापडले असल्याची माहिती आहे. सावंत यांचे नातेवाईक, वडील आणि भाऊ संचालक असलेल्या नामधारी कंपन्यांच्या नावाने ही बँक खाती आहेत.

याच नामधारी/बनावट कंपन्यांच्या नावे मालमत्ता विकत घेतल्याचं ईडीच्या तपासातून उघड झालं आहे. कर्ज काढून मालमत्ता घेतल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी कर्जाची परतफेड कॅशच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच सावंत यांचा राहता फ्लॅट देखील नामधारी कंपनीच्या नावाने असल्याचे ईडी तपासात आढळून आलं आहे.

आयआरएस अधिकारी सचिन सावंत सध्या लखनऊमध्ये सेवेत होते. ते कस्टम्स आणि जीएसटीसाठी काम करत होते. सावंत बराच काळापासून ईडीच्या रडारवर होते. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अचानक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत टीमला त्याच्या अपार्टमेंटमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि बँकेशी संबंधित तपशील मिळाले.

सचिन सावंत 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. त्यांच्याबाबात सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांनी अंमलबजावणी संचालनालयातदेखील काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते चार वर्षांपासून मुंबई ईडी कार्यलयात सेवेत होते. सावंत यांची ईडीमध्ये नियुक्ती असताना मुंबईतील एका डायमंड कंपनीने 500 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सचिन सावंतही सीबीआयच्या रडारवर आले होते. तपासादरम्यान मनी लाँड्रिंग आढळल्यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आणि आता तपास यंत्रणेने स्वतःच्याच एका माजी अधिकाऱ्याला अटक केली आहे.