कृषि यांत्रिकीकरणातील आव्हानांचे संधीमध्ये रुपांतर करा – डॉ. रवींद्र बनसोड, हळगाव कृषि महाविद्यालयात ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण संपन्न

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शेतीमध्ये आव्हाने खूप आहेत.आजच्या काळात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानाला तोंड देणे अवघड होत चालले आहे. परंतु शेतकरी बांधवांनी न डगमगता या आव्हानाचे रुपांतर संधीमध्ये करावे. कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जागतिक वातावरण बदलावर आपण मात करू शकतो,आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना नैसर्गिक पद्धतीची कास धरणे आजच्या काळाची गरज आहे,असे प्रतिपादन कृषि अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले.

Convert challenges in agricultural mechanization into opportunities - Dr. Ravindra Bansod, Sugarcane cultivation technology and mechanization training completed at Halgaon Agricultural College

अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रवींद्र बनसोड बोलत होते. कार्यक्रमाच्य् अध्यक्षस्थानी हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे हे होते.

Convert challenges in agricultural mechanization into opportunities - Dr. Ravindra Bansod, Sugarcane cultivation technology and mechanization training completed at Halgaon Agricultural College

हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे म्हणाले की, हळगाव कृषि महाविद्यालय तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबंध आहे. शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्याशिवाय शेती अशक्य आहे आणि हेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे महाविद्यालय विक्री केंद्र सुरु करणार आहे. यामध्ये बियाणे, जैविक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रवे, विविध प्रकाशने या केंद्रावर उपलब्ध होतील असे ते म्हणाले.

Convert challenges in agricultural mechanization into opportunities - Dr. Ravindra Bansod, Sugarcane cultivation technology and mechanization training completed at Halgaon Agricultural College

जामखेडचे तालुका कृषि अधिकारी रवींद्र घुले यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी प्रास्ताविकातून शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे असणारे महत्व विषद केले.

Convert challenges in agricultural mechanization into opportunities - Dr. Ravindra Bansod, Sugarcane cultivation technology and mechanization training completed at Halgaon Agricultural College

डॉ. अंबादास मेहेत्रे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, डॉ. रविकिरण राठोड यांनी ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, प्रा. महेश पाचारणे यांनी ड्रोन-ऊस शेतीसाठी वरदान, डॉ. संजय भांगरे यांनी खोडवा ऊस व्यवस्थापनाकरीता उपयुक्त यांत्रिकीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ. अनिकेत गायकवाड यांनी सूक्ष्म अन्नद्रव फुले मायक्रो ग्रेडची माहिती शेतकऱ्यांना दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी, महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रगतशील शेतकरी प्रद्युम्न महाजन यांनी ड्रोनबाबत मार्गदर्शन करून  फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे तर आभार प्रदर्शन डॉ. निकिता धाडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ७५ शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद नोंदवला.