Ram Shinde News : छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक प्रवेशद्वार भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल – प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर, दि. १२ – छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे स्वराज्य, स्वातंत्र्य आणि जनकल्याणाच्या कार्यासाठी सदैव प्रेरणास्थान आहेत. अहिल्यानगर येथे उभारलेले प्रवेशद्वार हे केवळ भव्य वास्तू नसून,भावी पिढ्यांना देशभक्ती, शौर्य आणि ऐक्याचा संदेश देणारे स्मारक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

शहरातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकस्थळी उभारण्यात आलेल्या मराठाकालीन शैलीतील प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब पवार, अमोल गाडे, सागर बोरुडे, काकासाहेब तापकीर, सौ. नंदाताई पांडुळे, स्मारक समितीचे यशवंत तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

“आमदार स्थानिक विकास निधीतून अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराचे लोकार्पण माझ्याच हस्ते करण्याचा मला मनःस्वी आनंद आहे,” असे प्रा. शिंदे म्हणाले. या उपक्रमाच्या यशासाठी स्मारक समिती, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि स्थानिक नागरिक यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

“अशा स्मारकांमुळे आपला ऐतिहासिक वारसा जपला जातो आणि समाजात एकतेचा तसेच प्रेरणेचा संदेश पोहोचतो. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असेही त्यांनी सांगितले. तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेला लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

स्मारक परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रा. शिंदे यांनी यावेळी पहाणी केली. ही कामे उत्तम पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमास समितीचे सदस्य, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून, अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या “छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक प्रवेशद्वार” चे लोकार्पण आज माझ्या शुभहस्ते पार पडले.छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे स्वराज्य, स्वातंत्र्य आणि जनकल्याणाच्या कार्यासाठी सदैव प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना, हे प्रवेशद्वार केवळ एक भव्य वास्तू नसून, आपल्या भावी पिढ्यांसाठी देशभक्ती, शौर्य आणि ऐक्याचा संदेश देणारे प्रेरणादायी स्मारक ठरणार आहे, प्रा राम शिंदे म्हणाले.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

या लोकार्पण सोहळ्याला माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक अमोल गाडे, माजी नगरसेवक सागर बोरुडे, सभापती काकासाहेब तापकीर, राजमुद्रा करिभर अकॅडमीच्या नंदाताई पांडुळे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजयसिंह होलम, स्मारक समितीचे.यशवंत तोडमल यांच्यासह समितीचे सदस्य, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chhatrapati 4th Shivaji Maharaj Memorial Entrance Gate Will Be Inspiring for Future Generations – Ram Shinde, latest marathi news,

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि स्थानिक नागरिक यांचे सहकार्य मोलाचे ठरले. अशा स्मारकांमुळे आपली ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी पार पाडली जातेच, पण त्यासोबतच समाजात एकतेचा आणि प्रेरणेचा संदेशही पोहोचतो, असे यावेळी शिंदे म्हणाले.