Padma Awards 2024 : केंद्र सरकारने केली पद्म पुरस्कारांची घोषणा, 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर, कोणाला कोणता पद्म पुरस्कार मिळाला पहा संपुर्ण यादी !
नवी दिल्ली : Padma Awards 2024 : भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर (Republic Day 2024) पद्म पुरस्कारांची (Padma awards 2024) घोषणा केली आहे. यंदा 132 जणांना पद्म पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.यात 110 पद्मश्री, 05 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.पद्म पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये 30 महिला मान्यवरांचा समावेश आहे.

Padma Awards 2024 : भारत सरकारतर्फे दरवर्षी पद्मविभुषण, पद्मभूषण व पद्श्री हे तीन प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार विविध क्षेत्रात खास योगदान देणाऱ्या मान्यवरांना बहाल केले जातात. सरकारने यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. सरकारने पद्मविभूषण पुरस्कारासाठी (padma vibhushan awards 2024l जणांची निवड केली आहे. यामध्ये वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू) के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश) एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश) बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार) पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू) यांचा समावेश आहे.
Padma Awards 2024 : सरकारने 22 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच 110 जणांना पद्मश्री (Padma shri awards 2024) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलारी, दुखु माझी, के. चेलम्माल, संगथनकिमा, हिमचंद मांझी, यनुंग जेमो, सोमन्ना, सर्वेश्वर बी., प्रेमा धनराज, उदय देशपांडे, वाय. इटालिया, शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, रतन कहर, अशोक कुमार बी., बाळकृष्ण वेल्ली, उमा माहेश्वरी, गोपीनाथ एस., स्मृती रेखा चक्मा,ओमप्रकाश शर्मा, नारायण ईपी, भागवत प्रधान, एस.आर. पाल, बद्रापन एम., जॉर्डन लेप्चा, एम. सासा, जानकीलाल, डी. कोंडप्पा, बाबू राम यादव, नेपाल चंद्रा यांचा समावेश आहे.
Padma Awards 2024 : पार्वती बरुआ ह्या भारतातील पहिल्या महिला हत्ती माहुत आहेत. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच झारखंडमधील जशपूर जिल्ह्यातील आदिवासी कल्याण कार्यकर्ता जागेश्वर यादव यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. 132 जणांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे, चक 8 जण परदेशी, एनआयआर, पीआयओ, ओसीआय या प्रवर्गातील आहेत. तसेच 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Padma bhushan Awards 2024 : केंद्र सरकारने ज्या 17 दिग्गजांना पद्म भूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (मरणोत्तर) यांचाही समावेश आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, अभिनेता मिथून चक्रवर्ती, तायवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे चेअरमन यंग लिउ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. उद्योगपती सीताराम जिंदल, वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट अश्विन बालचंद मेहता, माजी केंद्रीय मंत्री सत्यव्रत मुखर्जी, संगीतकार प्यारेलाल शर्मा, पॉप म्युजिक क्वीन उषा उत्थुप, अभिनेता विजयकांत आणि माजी राज्यसभा खासदार ओलानचेरी राजगोपाल यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Padma Awards 2024)
Padma Awards 2024 : महाराष्ट्रातून कोणाला मिळाले पद्म पुरस्कार ?
- श्री होर्मुसजी एन कामा – पद्मभूषण पुरस्कार – साहित्य आणि शिक्षण – पत्रकारिता
- श्री अश्विन बालचंद मेहता – पद्मभूषण पुरस्कार – वैद्यकीय
- श्री राम नाईक – पद्मभूषण पुरस्कार – सामाजिक कार्य
- श्री दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त – पद्मभूषण पुरस्कार – कला
- श्री कुंदन व्यास – पद्मभूषण पुरस्कार – साहित्य आणि शिक्षण – पत्रकारिता
- श्री उदय विश्वनाथ देशपांडे – पद्मश्री पुरस्कार – क्रिडा
- श्री मनोहर कृष्णा डोळे – पद्मश्री पुरस्कार – वैद्यकीय
- श्री झाकीर आय काझी – पद्मश्री पुरस्कार – साहित्य आणि शिक्षण
- श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम – पद्मश्री पुरस्कार – वैद्यकीय
- कल्पना मोरपरिया – पद्मश्री पुरस्कार – व्यापार आणि उद्योग
- श्री शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर – पद्मश्री पुरस्कार – सामाजिक कार्य
- प्यारेलाल शर्मा – कला
भारतात पद्म पुरस्कारांची सुरुवात कधी झाली ?
भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. पद्म पुरस्कार हा पद्म विभूषण, पद्म विभभूषण, पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिला जातो. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार पुरस्कार देण्याची सुरुवात १९५४ पासून सुरुवात केली. पुढे १९५५ साली पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असं नामकरण करण्यात आलं. तेव्हापासून विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. (Padma Awards 2024 )
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये, क्षेत्रात हे पुरस्कार प्रदान केले जातात. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी ‘पद्मविभूषण’; उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते. (Padma Awards 2024 )
Padma awards 2024 list 👇