Dindori SDO Dr. Nilesh Apar case : 40 लाखांच्या लाचप्रकरणी प्रांताधिकार्यावर गुन्हा दाखल, Nashik ACB ची कारवाई, राज्याच्या महसूल विभागात उडाली मोठी खळबळ
नाशिक : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ अनिल रामोड (Anil Ramod IAS) यांच्या लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक महसुल विभागातून मोठी बातमी समोर आली. नाशिक महसुल विभागात कार्यरत असलेल्या दिंडोरीच्या प्रांत अधिकाऱ्यावर (Dindori SDO) 40 लाख रूपयांची लाच स्विकारण्याची तयारी दाखवल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap On Dr Nilesh Apar) एसीबीच्या या कारवाईमुळे राज्याच्या महसुल विभागात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. (Dindori Sub Divisional Officer Dr. Nilesh Apar)
याबाबत सविस्तर असे की, मुंबई येथील एका 57 वर्षीय व्यावसायिकाने दिंडोरी येथे कंपनीचे बांधकाम करताना अकृषीक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे दिंडोरीचे प्रांताधिकारी डाॅ निलेश अपार यांनी संबंधित व्यावसायिकास नोटीस बजावली होती. नोटीस बजावण्याबरोबरच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी आदेश दिले होते.सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रांताधिकारी डाॅ निलेश अपार यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयांची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दाखविली होती. 22 मे 2022 रोजी ही घटना घडली होती.
त्यामुळे संबंधित व्यावसायिकाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रांत अधिकारी निलेश अपार यांची तक्रार केली होती. त्या तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निलेश अपार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap On Dr Nilesh Apar)
सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, (Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar),अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार, (DySP Narendra Pawar), पो.नि.संदिप साळुंखे (PI Sandeep Salunkhe), पो.हवा. डोंगरे पो.हवा. इंगळे यांनी केली आहे.
नाशिक विभागात लाचखोरीचे प्रकरणे सातत्याने घडत आहेत. अनेक बडे मासे एसीबीच्या गळाला लागले आहेत. जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी यासारखे बडे अधिकार अडकले आहेत. आता महसूल विभागातील क्लास वन अधिकारी असलेले प्रांताधिकारी डाॅ निलेश अपार एसीबीच्या गळाला लागले आहेत.एसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
दिंडोरीचे प्रांताधिकारी डाॅ निलेश अपार (Dindori Sub Divisional Officer Dr. Nilesh Apar) यांची काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात बदली झाली होती. बदली होऊन स्थिरस्थावर होत नाही तो निलेश अपार 40 लाखांच्या लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. अपार यांच्यावरील कारवाईमुळे महसुल विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.