ब्रेकिंग न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची तारीख ठरली !

अहिल्यानगर, दि. २२ – ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये व विभागीय आयुक्त नाशिक यांच्या मान्यतेनुसार अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेली ही रचना उद्या (२२ ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Breaking News, Zilla Parishad and Panchayat Samiti set date to publish final ward structure,  ahilyanagar latest news,

या अंतिम प्रभाग रचनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलक, संकेतस्थळ, जिल्हा परिषद कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन राजपत्रान्वये ही रचना प्रसिद्ध होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी कळविले आहे.