खळबळजनक : भल्या सकाळी हॉटेल चालकाने संपवली जीवनयात्रा, जामखेड तालुक्यातील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : हाॅटेल चालकाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking News, Sensational, Hotel owner ashok babasaheb jadhav ends his life in today morning, incident in pimparkhed Jamkhed taluka,

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज २७ रोजी भल्या सकाळी पिंपरखेड येथील हाॅटेल चालक अशोक बाबासाहेब जाधव हे आपल्या हाॅटेलमध्येच गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.या धक्कादायक घटनेने पिंपरखेड परिसर हादरून गेला आहे. जाधव यांचे पिंपरखेड येथे चायनीज व चहाचे हाॅटेल होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांना जाधव यांच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून त्यात काही नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आत्महत्या की घातपात या दृष्टीने पोलिस वेगाने तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…