ब्रेकिंग न्युज : जामखेड तालुक्यातील जुगार अड्ड्यावर एलसीबीची सर्वात मोठी कारवाई, छापेमारीत ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ४० जणांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड तालुक्यात सर्वात मोठी कारवाई करत तिरट जुगार अड्डा उध्वस्त केला. जुगार अड्ड्यावर केलेल्या छापेमारीत ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई १० रोजी रात्री करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking News, LCB's biggest operation on gambling den in Jamkhed taluka, valuables worth Rs 37 lakh seized in raid, cases registered against 40 people, kharda jategaon news today,

10/09/2025 रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नेमण्यात आलेले पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे लक्ष्मण प्रभु गायकवाड व त्याचे इतर साथीदार असे जातेगांव शिवारातील जातेगांव रोड, निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी 5 डावांमध्ये काही इसम गोलाकार बसुन पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले.

सदर इसमांना जागीच बसण्यास सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्याची नावे 1) बाळासाहेब चांगदेव खाडे वय- 50 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 2) बाळासाहेब रामचंद्र नेटके वय-63 वर्षे रा. जामखेड ता.जामखेड, 3) संतोष विजयसिंग साळुंके वय- 45 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड, 4) राजेंद्र मुरलीधर आहेर वय-39 वर्षे रा. डोकेवाडी ता.भुम, जि.धाराशिव 5) रामचंद्र बापुराव राळेभात वय-70 वर्षे रा. जामखेड ता. जामखेड, 6) दादासाहेब पांडुरंग गायकवाड वय-60 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड जि. अहिल्यानगर 7) अजय बबन सकट वय-38 वर्षे रा. खर्डा, ता.जामखेड जि. अहिल्यानगर,

8) रविंद्र महादेव भुते वय- वय-36 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड 9) पवन बबन थोरात वय-37 वर्षे रा. इट ता.भुम जि.धाराशिव 10) दत्तात्रय मुरलीधर घाटे वय- 43 वर्षे रा. नागेवाडी ता. भुम जि. धारशिव 11) नितीन श्रीराम गिते वय-38 वर्षे रा. दिघोळ ता.जामखेड, 12) मारुती छना गिते वय-48 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड जि.अहिल्यानगर 13) बापु अनुरथ चव्हाण वय-40 वर्षे रा. पकरुड ता. भुम जि. धारशिव 14) सुनिल नरसिंग काळे वय-34 वर्षे रा. पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड, 15) विक्रम अरुण शिंदे वय-50 वर्षे रा.दिघोळ ता. जामखेड

16) दादासाहेब महादेव गायकवाड वय-44 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड 17) मधुकर नाथोबा बांगर वय – 60 वर्षे रा. बाहेळा ता.पाटोदा, जि.बीड 18) गणेश सुगरीब दौंड वय-39 वर्षे रा.दौंडाचीवाडी ता.जामखेड 19) पंडित किसन दाताळ वय-36 वर्षे रा. वाकी ता.जामखेड 20) चंद्रकांत नागुराव गावडे वय-50 वर्षे रा. पारगांव ता.वाशी, जि. धाराशीव 21) अहमद नुरखा पठाण वय-43 वर्षे रा.बोरखेड ता.जि.बीड, 22) पोपट उत्तम राजगुरु वय-37 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड, 23) संतोष दत्तात्रय राऊत वय-52 वर्षे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड, 24) संजय बबन भोसले वय-23 वर्षे रा.अमळनेर ता.पाटोदा जि.बीड,

25) भगवान चंद्रकांत गरड वय-34 वर्षे रा.कोष्टीगल्ली भुम ता.भुम जि.धाराशीव 26) गणेश शिवाजी शिंदे वय-48 वर्षे रा. वैद्यकीणी ता. पाटोदा जि.बीड, 27) दत्तात्रय जयसिंग खंडागळे वय-40 वर्षे रा. मात्रेवाडी ता.भुम जि.धाराशिव 28) धनजंय भगवान मोटे वय-40 वर्षे रा. गिरवली ता.भुम जि.धाराशिव, 29) बाजीराव भगवान जाधव वय-52 वर्षे रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड, 30) अशोक उत्तम भोरे वय-35 वर्षे रा.पारगांव ता.वाशी. जि.धाराशिव, 31) शंकर दिगंबर आवारे वय-40 वर्षे रा.माळेवाडी ता. जामखेड

32) धोंडीबा बाबा येळे वय-45 वर्षे रा. मोहरी ता. जामखेड 33) फैय्याज मेहबुब सय्यद वय – 49 वर्षे रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड, 34) लक्ष्मण प्रभु गायकवाड वय-45 वर्ष रा. जातेगांव ता. जामखेड, 35) पोपट नाना खरतोडे वय-60 वर्षे रा.बोडकेवाडी ता.पाटोदा, जि.बीड, 36) सुनिल आश्रुबा बोबडे वय – 45 वर्षे रा.इट.ता.भुम जि. धाराशिव 37) रावसाहेब उत्तम राजगुरु वय-35 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 38) किरण मुकुंद गोलेकर वय – 42 वर्षे रा. खर्डा ता. जामखेड, 39) अकलाक अहमद शेख वय-31 वर्षे रा. बार्शी नाका, ता. जि. बीड, 40) अशोक रावसाहेब गिते रा. दिघोळ ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसमांची व ते बसलेल्या ठिकाणची झडती घेता त्यांचे कब्जामध्ये रोख रक्कम, तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य साधने, वाहने, मोबाईल असा एकुण 37,33,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांचेविरुध्द खर्डा पोलीस स्टेशन गु.र.नं. 147/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडाकेबाज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, शामसुंदर गुजर, मनोज साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने पार पाडली.