ब्रेकिंग न्यूज : सरकारने पालकमंत्री बदलले, संजय सावकारे यांच्या ऐवजी पंकज भोयर बनले भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री
Bhandara New Palak Mantri 2025 : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारकडून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर (Pankaj bhoyar) यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Bhandara new palak mantri 2025)

राज्याचे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री याबाबतचे पत्र जाहीर केले होते. सावकारे यांच्याजागी पंकज भोयर यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते, पण झेंडामंत्री म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. फक्त १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी या काळातच सावकारे भंडाऱ्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
पंकज भोयर हे भंडाऱ्याच्या जवळच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यांना भंडारा जिल्ह्याची जाण मोठ्या प्रमाणात असू शकते. आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यावर पकड मजबूत करण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे का? अशी चर्चा आहे.
पंकज भोयर यांच्याकडे गोंदियामधील सह पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय आता भंडाऱ्याचीही जबाबादारी दिली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यावर भाजपची पकड मजबूत व्हावी, त्यासाठीच भाजपने भोयर यांच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय सावकारे यांचे डिमोशन करण्यात आले आहेत. भंडाऱ्याच्या पालकत्वाची जबाबादरी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.