ब्रेकिंग न्यूज : ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात हल्ल्याचा प्रयत्न, पहा घटनास्थळावरील लाईव्ह व्हिडिओ
जालना : मराठा अंदोलकांनी आज ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.ही घटना जालना शहरातील नागेवाडी परिसरात घडली.सदावर्ते हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. मराठा समाजात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे.याच नाराजीचे पडसाद रविवारी २१ रोजी जालना येथे उमटल्याचे बोलले जात आहे.

जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲड . गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे (Samruddhi Mahamarge ) जालना (Jalna) येथे आले असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताफ्यावर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नाही. गाडीचे नुकसान झाले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषण स्थळी रवाना झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच आज काकडे पेट्रोल पंपाजवळ मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
जालन्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या धनगर आंदोलनाला भेट देण्यासाठी सदावर्ते हे आज जात होते. त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला होता मात्र तरीही देखील काही मराठा आंदोलक सदावर्ते यांच्या गाडीवर धावून गेले आणि सदावर्ते यांच्या गाडीच्या काचेवर फटके मारले.
यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.