जामखेड टाइम्स वृत्तसेवा: ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी एकुण १ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाला आहे. या निधीतून ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.

‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेतून कर्जत व जामखेड या तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा याकरिता विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी पाठपुरावा हाती घेतला होता.त्यास यश मिळाले असून सरकारने कर्जत तालुक्यातील नांदगाव, निंबे आणि वडगाव तनपुरा, तसेच जामखेड तालुक्यातील सोनेगाव आणि घोडेगाव या ५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये असा एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ ही संकल्पना आता वास्तवात उतरू लागली आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत इमारती केवळ प्रशासनाचे केंद्र न राहता, त्या शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक बांधकामाचे आदर्श उदाहरण ठरतील. ग्रामपंचायतींचा विकास म्हणजे ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणे हा ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेचा उद्देश आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या माध्यमांतून कर्जत तालुक्यातील नांदगाव, निंबे आणि वडगाव तनपुरा, तसेच जामखेड तालुक्यातील सोनेगाव आणि घोडेगाव या गावांमध्ये हरित तत्त्वांवर आधारित बांधकाम संस्कृतीला प्रोत्साहन मिळून ग्रामविकासाला नव्या दिशेची गती मिळेल. प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल. सदरचा निधी मंजुर केल्याबद्दल विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.