Pravin Ghule : कर्जत जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप, भाजपाचे जेष्ठ नेते पै. प्रविण घुले पाटलांचा शिवसेनेत प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत भाजपचे जेष्ठ नेते पै प्रविण दादा घुले पाटील (Pravin Ghule Karjat) यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत भाजपला (BJP) रामराम ठोकला. प्रविण घुले यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश (Shiv sena Join) केला आणि कर्जत जामखेडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.(Karjat Jamkhed Politics)

Big news, Big earthquake in Karjat Jamkhed politics, senior BJP leader Pravin Ghule Patil joins Shiv Sena, Ram Shinde, latest news,

काँग्रेसमधून भाजपात आलेले कर्जतचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी सोमवारी भाजपाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि कर्जत-जामखेडच्या राजकारणात भूकंप घडवला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रवीण घुले यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. घुलेंनी शिवसेनेत केलेला पक्ष प्रवेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पै प्रवीण घुले यांनी ११ मार्च २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला होता. राम शिंदे यांनी घुलेंना सोबत घेत बाजार समिती यासह कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांची एकहाती आलेल्या सत्तेस सुरुंग लावत सत्तांतर घडवले होते.

मात्र अचानक सोमवारी प्रवीण घुले समर्थकांनी सोशल मीडियावर जय महाराष्ट्र स्टेटस लावत कर्जतच्या स्थानिक राजकारणात बदलाचे चित्र स्पष्ट केले होते. संध्याकाळी साडे आठ वाजता प्रवीण घुले यांनी मुंबई शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. घुलेंचा भाजपातून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणे राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाचे नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्याने नगरपंचायतीच्या सत्ता समीकरणात बदल घडेल का ? असा प्रश्न उभा राहिला आहे. नगराध्यक्षा रोहिणी घुले या भाजपात राहणार की ? त्या देखील आगामी काळात शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असताना घुले बंधूच्या या निर्णयाने राम शिंदे गटात खळबळ उडाली आहे.