Samriddhi Marg Bridge Collapse : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, गर्डर लॉन्चिंग मशीन कोसळून 17 जणांचा मृत्यू, बचावकार्य वेगाने सुरू

मुंबई : Samriddhi Marg Bridge Collapse : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. खाजगी बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आता या मार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात (accident latest news) झाला आहे. उड्डाणपुलाचे (Flyover) काम सुरू असताना गर्डर क्रेन मशीन कोसळली. या दुर्घटनेत अत्तापर्यंत 17 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शहापूर (Shahapur thane) तालुक्यातील सरलांबे (sarlambe) जवळ पुल कोसळण्याची (bridge collapse) ही दुर्घटना घडली आहे. NDRF च्या दोन टीम वेगाने बचावकार्य करत आहेत.(samriddhi marg accident)

समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर नागपुर ते शिर्डी दरम्यान सतत अपघात घडत आहेत. समृध्दी महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बनू लागला की काय? असे बोलले जात आहे. अश्यातच या मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. ठाण्याच्या शहापूर तालुक्यात सरलांबे भागात उडलडाणपुल उभारणीचे काम वेगाने सुरू होते. सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी काम सुरू असताना पुलाचे सिमेंटचे भाग उचलणारे महाकाय ग्रेडर मशीन कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 17 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अनेक कामगार अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.(Samriddhi Marg Bridge Collapse)

घटनास्थळी NDRF च्या दोन टीम व स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. क्रेन खाली आणखीन दहा ते 15 कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेचे माहिती मिळताच बांधकाम मंत्री दादा भूसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Samriddhi Marg Bridge Collapse)

Big breaking, Terrible accident on Samriddhi highway, 17 people died after girder launching machine collapsed, rescue operation is on fast, sarlambe Shahapur Thane accident,(Samriddhi Marg Bridge Collapse)

सोमवारी मध्यरात्री गर्डर जोडण्याचं काम करणारी क्रेन उड्डाणपुलाच्या स्लॅबवर कोसळली. त्यामुळे क्रेन आणि उड्डाणपुलाचा स्लॅब 100 फुटांवरून कोसळला. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.

मृतांची नावं (सध्यापर्यंत उपलब्ध यादी) (Samriddhi Marg Bridge Collapse death list)

पप्पू कुमार – बिहार
राजेश शर्मा- उत्तराखंड
संतोष जैन- तामिळनाडू
प्रदीप रॉय- पश्चिम बंगाल
कन्नूर- तामिळनाडू
अरविंद कुमार उपाध्याय- उत्तर प्रदेश
लल्लन राजभर- उत्तर प्रदेश
आनंद कुमार चंद्रमा यादव
बेलदार
सुरेंद्र कुमार पासवान
राधेश्याम बिरजू यादव
परमेश्वर कुमार

दरम्यान, समृध्दी महामार्ग उभारणीचे कंत्राट नवयुग इंजिनिअरिंग या कंपनीकडे आहे. 1986 सालापासून ही कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. शहापूर येथे समृद्धीच्या कामादरम्यान कोसळलेलं मशिन सिंगापूर बनावटीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर काम करताना सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे.