खळबळजनक : पुणे हादरलं ! भल्या पहाटे गोळीबाराचा थरार, सहायक पोलिस आयुक्ताने केली पत्नी व पुतण्याची हत्या, त्यानंतर ACP Bharat Gaikwad यांनी केली आत्महत्या !

ACP Bharat Gaikwad : पुणे शहराच्या बाणेर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची हत्या केली. त्यानंतर स्वता: आत्महत्या केल्याची घटना घडली उघडकीस आलीय.या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मयत वरिष्ठ पोलिस अधिकारी अमरावतीच्या राजपेठ विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. ही घटना कोणत्या कारणातून घडली याचा पुणे पोलिस वेगाने शोध घेत आहेत.

Assistant Commissioner of Police Bharat Gaikwad killed his wife and nephew by firing bullets, acp bharat Gaikwad committed suicide news, pune latest crime news today,

अमरावती पोलिस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत भरत शेका गायकवाड (ACP Bharat Sheka Gaikwad) यांचे कुटुंब पुण्यात बाणेर येथे वास्तव्य होते. त्यांच्या पत्नी, दोन मुले व पुतण्या असे चौघे जण पुण्यात राहत होते.

शनिवारी ते सुट्टीसाठी पुण्यात आले होते. भरत गायकवाड यांनी परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार करत पत्नी मोनी भरत गायकवाड (वय 44) Moni bharat Gaikwad, पुतण्या दिपक गायकवाड (वय 35) Dipak Gaikwad या दोघांची हत्या केली.

त्यानंतर भरत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) यांनी स्वता: आत्महत्या केली. ही घटना भल्या पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची हत्या करत स्वता: आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कोणत्या कारणातून घडली हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. या घटनेचा तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.